Homeव्हिडिओ बातम्यानगरसेविका सौ राजश्रीताई मोहन पवार यांच्यावतीने मकर संक्रात निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम...

नगरसेविका सौ राजश्रीताई मोहन पवार यांच्यावतीने मकर संक्रात निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न :

जामखेड नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माजी सभापती तथा नगरसेविका सौ राजश्रीताई मोहन पवार यांच्यावतीने मकर संक्रात निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी

सालाबाद प्रमाणे याही वर्षी नगरपरिषदेच्या माजी सभापती तथा नगरसेविका सौ राजश्रीताई मोहन पवार व युवा नेते मोहन (वस्ताद) पवार यांच्या वतीने दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत प्रभाग क्रमांक ९ येथील संतोषी माता मंदिरा शेजारील आपल्या निवासस्थानी महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी शेकडो महिला माता-भगिनी उपस्थित होत्या. यावेळी राजश्रीताई पवार यांनी महिलांना हळदीकुंकू तसेच तिळगुळ देऊन वाणाचे वाटप केले तसेच महिलांनी मोठ्या उत्साहात हळदी- कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी महिलांनी एकत्र येत उखाणे घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या ,सुनिताताई मधुकर राळेभात,नगरसेविका गटनेत्या विद्याताई ओव्होळ,भाजपा माहिला आघाडी च्या तालुका उपाध्यक्षा लक्ष्मीताई पवार, भाजपा माहिला युवती आघाडी च्या शहराध्यक्षा वैशालीताई शिंदे,मिराताई तंटक,निशाताई कदम,शितलताई सुरवसे,साळवे ताई,शिंदे ताई,माने, राऊत ताई
आदी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जामखेड नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माजी सभापती तथा नगरसेविका राजश्री पवार व युवक नेते मोहन पवार यांच्या वतीने दरवर्षी मकर संक्रांती, भाऊबीज, गणेश उत्सव असे विविध सण उत्सव, विविध क्षेत्रात यश मिळविलेले विद्यार्थी व खेलाडू यांचे सन्मान व विविध स्पर्धामध्ये यश मिळविलेल्या मंडळाचे सन्मान सोहळे आयोजित करत असतात.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!