Homeव्हिडिओ बातम्यातोंडावर दसरा दिवाळी व्यावसायिकांची प्रशासनाने केली होळी अतिक्रमणे काढणे क्रमप्राप्त पण...

तोंडावर दसरा दिवाळी व्यावसायिकांची प्रशासनाने केली होळी अतिक्रमणे काढणे क्रमप्राप्त पण वेळ चुकली ! समर्थ हाँस्पीटल पासून कारवाईस प्रशासन असमर्थ ; मोजणी ,हद्द खुणानाट्य ;कारवाई पार्ट 2 संयुक्त कारवाई मग सर्व यंत्रणा हजर का नाही व्यापारयांचा विरोध नाही; प्रशासनात समन्वय नाही तहसिलदार हाकतात उंटावरून शेळ्या ?

तोंडावर दसरा दिवाळी व्यावसायिकांची प्रशासनाने केली होळी

अतिक्रमणे काढणे क्रमप्राप्त पण वेळ चुकली !

समर्थ हाँस्पीटल पासून कारवाईस प्रशासन असमर्थ ;

मोजणी ,हद्द खुणानाट्य ;कारवाई पार्ट 2

संयुक्त कारवाई मग सर्व यंत्रणा हजर का नाही

व्यापारयांचा विरोध नाही; प्रशासनात समन्वय नाही

तहसिलदार हाकतात उंटावरून शेळ्या ?

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील महामार्गालगतचे तसेच नालीपासून दहा फुटांपर्यंतचे अतिक्रमण काढणे आवश्यक आहे .पाणी पाईप लाईन व ड्रेनेज पाईपलाईन टाकल्यानंतरच शहरातील विविध विकास कामे करता येतील . शहर विकासासाठी अनेक दिवसांपासून प्रलंबित अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे मात्र सध्या दुष्काळी परिस्थिती आहे .दसरा दिवाळी तोंडावर आहे. अतिक्रमण काढण्यास प्रशासनाला हिच वेळ का सुचली ?असा प्रश्न उपस्थित होत आहे .

अनेक वेळा बीड रोडवरून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होते आणि समर्थ हाँस्पीटल जवळ येऊनच थांबते.तेथेच प्रशासन का असमर्थ ठरत आहे हे अद्याप कळले नाही ? नालिपासुन दहा फूट अंतरात सरसकट अतिक्रमणे काढण्यात येणार सांगितले .कोणाच्याही दबावाखाली न येता सर्वाना समान न्याय देणार.नियमातच अतिक्रमणे काढणार असे सांगितले मात्र समर्थ हॉस्पिटल नंतरच मोजणी ,हद्द खूणा हे नाट्य का चालू झाले हाही प्रश्नच आहे .याबाबत दुकानदारांमध्ये अद्याप संभ्रम आहे .नाली झाली नाही तेथे महामार्गाच्या हद्द खूणा झाल्या नाही तर मग न्यायालयाच्या आदेशानुसार संयुक्त मोजणी केली .तेव्हाच खूणा का नाही केल्या ? एवढी मोठी अतिक्रमणं काढण्याचे ठरले मग कारवाई चालू करण्याअगोदरच हद्द खूणा का नाही केल्या ? ऐनवेळी कारवाई थांबल्यानंतर व्यापारी व मालमत्ता धारकांमध्ये संभ्रम व संशय निर्माण झाला .याला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावरून प्रशासनात समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसत आहे .
अतिक्रमणे काढण्यासाठी कोणत्याही व्यापारी व मालमत्ता धारकांची विरोध, अडथळा नाही .फक्त महामार्गाच्या मध्यापासून नाली आणि नालीपासून ठरलेले दहा फुट असे सगळीकडे एकच मोजमाप लावून अतिक्रमणे काढावे असे सर्वाचे म्हणणे आहे .मात्र आधिकारी व्यापाऱ्यांचे म्हणणे नीट ऐकून घेतांना दिसत नाहीत.
विशेष म्हणजे अतिक्रमण काढण्याच्या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न संभाळण्याची जवाबदारी तहसीलदार यांच्याकडे आहे. आज चौथा दिवस आहे .अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे अतिक्रमण कारवाई थांबली .काही ठिकाणी बाचाबाची होता होता राहीली. अनेक संभ्रम निर्माण झाले . त्या त्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख तहसीलदार प्रत्यक्षात कारवाई ठिकाणी उपस्थित झाले नाही .दिवसातून दोन वेळा संबधित आधिकारी व नागरिक तहसीलदाराकडे तहसील आँफीसला चकरा मारतांना दिसले.


अतिक्रमणे काढतांना ब्रेकर ऐवजी कटर मशीनचा उपयोग होणे आवश्यक आहे .काही दुकानदार आम्ही कटर मशीन लावून काढून घेतो म्हणत आहेत .मात्र आधिकारयांचे त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे .2-3 फुट इमारत तोडताना ब्रेकरमुळे 1010 फुटांपर्यंत हादरे बसुन इमारतींचे मोठे नुकसान होतांना दिसत आहे .दुकानदार व्यापारी  व्याकूळ होऊन आधिकारयांच्या तोंडाकडे पहातात आणि आधिकारी एकमेकांवर टोलवाटोलवी करतात असा प्रकार पहायला मिळत आहे .

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!