Homeव्हिडिओ बातम्याजामखेड पोलिसांनी दाखवली सामाजिक जाणीव :प्रवाशांच्या त्रासाची दखल घेत बस स्थानकात करून...

जामखेड पोलिसांनी दाखवली सामाजिक जाणीव :प्रवाशांच्या त्रासाची दखल घेत बस स्थानकात करून घेतले मुरूमकरण

शेवटी पोलीसांनीच सामाजिक जाणीव दाखवली

प्रवाशांच्या त्रासाची दखल
बस स्थानकात मुरूमीकरण करून घेतल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरात सततच्या पावसामुळे रस्त्यांवर तसेच बस स्थानकात सर्व चिखल झाला असून, प्रवाशांना उभा रहायला ना चालायला येते बस सर्व चिखलात उभा राहतात चालणे कठीण झाले आहे. बस स्थानक प्रशासनाने दखल घेण्याऐवजी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी प्रवाशांचे हाल व बसेची आत बाहेर जाण्याच्या गेटच्या आतील आवस्था पाहून सामाजिक जाणीवेतुन मोठे दिलासा देणारे काम केले. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी त्यांनी आगारप्रमुख प्रमोद जगताप तसेच गुरुदत्त कंन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांना बोलावून समोरील दयनीय अवस्था दाखवत चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी तातडीने मुरूम आणून बस स्थानक परिसरात टाकून चिखलमुक्ती केली आणि दोन दिवसांत परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. जामखेड बस स्थानकाचे बांधकाम गेल्या साडेतीन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस स्थानक परिसरात पाणी साचणे आणि चिखल होणे याकडे ठेकेदार आणि एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे प्रवाशांना चिखलात उभे राहावे लागत असून, स्वच्छतेचीही समस्या निर्माण झाली आहे.
जुन्या निवाऱ्याचे छत काढल्याने प्रवाशांना पावसात बाहेर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर अनेक तक्रारी करूनही कोणतीच कारवाई झाली नाही. अशा परिस्थितीत, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या कारवाईमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!