Homeव्हिडिओ बातम्याजनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरा :- महेबूब शेख, जामखेड येथे शहाजी राळेभात...
जनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरा :- महेबूब शेख, जामखेड येथे शहाजी राळेभात यांच्याकडे सदिच्छा भेट, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा
जनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरा :- महेबुब शेख
जामखेडमध्ये शहाजी राळेभात यांच्याकडे सदिच्छा भेट
पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशध्यक्ष महेबुब शेख यांनी जामखेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शहाजी (काका) राळेभात यांच्या निवासस्थानी दि ३१ जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी जामखेड मधील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतला. तालुक्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी बोलतांना महेबूब शेख म्हणाले की जनतेच्या शासन व प्रशासन दरबारी अडिअचणी सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरा. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचा.
यावेळी जेष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ पोले,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, अवधूत पवार,नगरसेवक राजेंद्र गोरे,वसिम सय्यद,फिरोज कुरेशी, डॉ.कैलास हजारे,माजी ग्रामपंचायत सदस्य संजय डोके, कुंडल राळेभात,पाडळीचे सरपंच बाळासाहेब खैरे, बजरंग डूचे, अशोक घुमरे, साहिल बागवान, संजय डोके,सागर जगताप, अजित अडाले, बाळासाहेब कांबळे,सचिन शिंदे, अनिल रेडे,वसिम शेख, दादा महाडिक,दिपक घायतडक,दत्तात्रय डिसले, विकास अडाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जामखेड नगरपरिषद संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील प्रलंबित विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पुढील रणनीती, संघटन विस्तार व कार्यकर्त्यांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महेबुब शेख यांनी युवकांना पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन करत,जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करा, प्रत्येक प्रभागात संघटन मजबूत करा, याबाबत मार्गदर्शन केले.
पत्रकार यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!