Homeव्हिडिओ बातम्याचालू काम असलेल्या पुलाच्या खड्डय़ात पडुन अपघात .जामखेड येथील तरूण मोटारसायकल स्वार...

चालू काम असलेल्या पुलाच्या खड्डय़ात पडुन अपघात .जामखेड येथील तरूण मोटारसायकल स्वार ठार

चालू काम असलेल्या पुलाच्या खड्डय़ात पडुन अपघात
जामखेड येथील तरूण मोटरसायकलस्वार   ठार

जामखेड प्रतिनिधी

भातोडी ( ता आष्टी जि बीड )येथील नदीवर पुलाचे काम चालू आहे .पुलाच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने मोटारसायकलवरस्वार सरळ पुलाखाली पडल्याने गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .
या बाबत माहिती सविस्तर असे की जामखेड माहीजळगाव महामार्गावरील भातोडी (ता आष्टी जि बीड )फाटा ते हरिनारायण आष्टा या रोडचे काम चालू आहे .दरम्यान भातोडी येथे नदीवर पुलाचे काम सुरू आहे . सदर मयत बालाजी पागिरे(पुर्ण नाव माहीत नाही )रा. मतेवाडी ,हल्ली मुक्काम पोकळे वस्ती जामखेड हा तरूण पहाटेच्या वेळी ह.ना.आष्टा ता आष्टी जि बीड येथून जामखेड कडे येत होता .भातोडी येथे नदीवर चालू असलेल्या पुलाच्या कामाजवळ आला असता अंधारात पुलाच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने तो मोटारसायकलसह पुलात कोसळला .त्यात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला .

.सकाळी सकाळी भातोडी गावातील ग्रामस्थांची ये जा चालू झाली तेव्हा पुलात मोटारसायकलसह सह तरूण पडल्याचे दिसून आले . सदर मयत तरूण जामखेड येथील अवधूत हाँटेल मध्ये वेटर म्हणून काम करत होता .तरूणाच्या मोबाइलवर हाँटेल मालकाचा आलेला फोन ग्रामस्थांनी उचलला व सदर घटना सांगितली .अपघात घटना ऐकताच हाँटेल मालक घटनास्थळी तातडीने पोहचले.दरम्यान ग्रामस्थांनी रूग्णवाहिकेला फोन केला होता . ग्रामस्थांनी अपघात घडल्याची घटना आष्टी पोलीस स्टेशनला कळविली .

तसेच मृतदेह रूग्णवाहिकेतुन जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला .डॉक्टरांनी तपासून मयत झाले असल्याचे सांगितले .शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयातच मृतदेह ठेवण्यात आला आहे .प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!