Homeव्हिडिओ बातम्याचार महिन्यांच्या लहान बाळावर पाय देण्याची धमकी महिलेच्या गळ्याला कोयता लावून...
चार महिन्यांच्या लहान बाळावर पाय देण्याची धमकी महिलेच्या गळ्याला कोयता लावून १४ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम ?
चार महिन्यांच्या लहान बाळावर पाय देण्याची धमकी
महिलेच्या गळ्याला कोयता लावून १४ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम?
जामखेड प्रतिनिधी
चार महिन्याच्या लहान मुलावर पाय ठेवण्याची धमकी देत महीलेच्या गळ्याला कोयता लावुन घरातील तब्बल १४ लाख ६३ हजार रुपयांची सोन्या-चांदीची दागिने व रोख रक्कमेची जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे .या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवार दि २ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता सदरची घडली आहे.
पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी की फीर्यादी सौ. मनिषा श्रीमंत गोरे, वय ४६, व्यवसाय शिलाईकाम व शेती, रा. शिवाजीनगर, मदरसा जवळ, नान्नज ता. जामखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि २ आँक्टोंबर रोजी रात्री सुमारे २ वाजता फीर्यादी मनिषा गोरे या आपल्या चार महिन्यांच्या एका जुळ्या नातवंडांसोबत बेडरूममध्ये झोपलेल्या होत्या.
त्यांचे पती श्रीमंत गोरे, मुलगा अक्षय गोरे, सून प्रतीक्षा गोरे व दुसरा जुळा लहान मुलगा हे दुसऱ्या खोलीत झोपले होते. त्यावेळी कोणीतरी बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आवाज आल्याने फीर्यादी मनिषा गोरे यांना जाग आली. यावेळी दरवाजाची कडी तोडून तोंडाला मास्क लावलेले चार चोरटे घरात शिरले. त्यांनी आरडाओरड करू नये म्हणून मनिषा गोरे यांच्या गळ्याला कोयता लावला. तसेच जवळ झोपलेल्या लहान चार महीन्यांच्या नातवावर पाय ठेवण्याचा धाक दाखवत त्यांना गप्प केले. या
यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिने हिसकावून घेतले. कानातील झुमके ओढल्याने त्यांच्या उजव्या कानाची पाळीही तुटली.यानंतर चोरट्यांपैकी दोघांनी मनिषा गोरे यांच्या पती, मुलगा व सुनेला धमकावून कपाटातील दागिने काढून घेतले. घरातील कपाटे उचकटून या चोरट्यांनी सोन्याचे गळ्यातील हार नाकातील रिंग कर्णफुले साखळी गळ्यातील हार अंगठी चांदीच्या पायातील पट्ट्या १३ लाख १३ हजार व रोख रक्कम दिड लाख रुपये असा एकुण १४ लाख ६३ मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
यावेळी जाताना या चोरट्यांनी फीर्यादी यांच्या बेडरूमला बाहेरून कडी लावून कुटुंबीयांना आवाज न करण्याची धमकी दिली.
कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारील लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यानंतर कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आले. मनिषा गोरे यांच्या मुलगा अक्षय यांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना बोलावून चोरीस गेलेल्या दागिन्यांची माहिती देण्यात आली. फीर्यादी यांच्या कानाला जखम झाली असल्याने त्यांच्यावर रात्रीच्या सुमारास नान्नज येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले .
गळ्याला कोयता लावून दागिने हिसकावणारे दोन इसम अंदाजे १८ ते २५ वर्षे वयाचे, सडपातळ बांध्याचे व बुटके असल्याचे सांगण्यात आले आहे. तर पती, मुलगा व सुनेला धमकावून कपाटातील दागिने काढणारे अन्य दोन इसम अंदाजे १८ ते २२ वर्षे वयाचे, मजबूत बांध्याचे व सुमारे ५ फूट ५ इंच उंचीचे असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. चोरट्यांनी तोंडाला मास्क लावलेला असल्याने त्यांचे चेहरे ओळखता आले नसल्याचेही फीर्यादी महिलेने सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट व फॅरेन्सीक लॅब टीम ला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, या धाडसी जबरी चोरीच्या घटनेचा तपास सुरू असून, चार अनोळखी चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. याघटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करत आहेत .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!