Homeव्हिडिओ बातम्याखाजगी सावकारकी सर्वसामान्य जनतेच्या मुळावर; अवाच्या सव्वा व्याजाच्या जाचाने सामान्यांचा जीव मेटाकुटीस!...

खाजगी सावकारकी सर्वसामान्य जनतेच्या मुळावर; अवाच्या सव्वा व्याजाच्या जाचाने सामान्यांचा जीव मेटाकुटीस! जामखेड मध्ये तीन ठिकाणी अवैध सावकारांवर छापा

खाजगी सावकारकी सर्वसामान्य जनतेच्या मुळावर; अवाच्या सव्वा व्याजाच्या जाचाने सामान्यांचा जीव मेटाकुटीस!

जामखेड मध्ये तीन ठिकाणी अवैध सावकारांवर छापा

जामखेड प्रतिनिधी

ग्रामीण आणि शहरी भागात सध्या बेकायदेशीर खाजगी सावकारकीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अत्यंत गरजू आणि गरीब लोकांना महिन्याला १० टक्के (दहा रुपये टक्क्याने) अशा चक्रवाढ व्याजाने कर्ज देऊन त्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक केली जात आहे.

या जाचक अटींमुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबांचा जीव अक्षरशः मेटाकुटीस आला असून, अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
अनेकदा तातडीची वैद्यकीय मदत, मुलांचे शिक्षण किंवा लग्नाकार्यासाठी गरिबांना तातडीने पैशांची गरज भासते. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कागदपत्रांची पूर्तता आणि कर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ यामुळे सामान्य नागरिक नाईलाजाने या खाजगी सावकारांच्या दारात जातात. याचाच गैरफायदा घेऊन हे सावकार कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय अव्वाच्या सव्वा दराने व्याजाची आकारणी करत आहेत.

.१० टक्के व्याजाचे दुष्टचक्रदहा रुपये टक्क्याने घेतलेले कर्ज हे वरवर पाहता लहान वाटत असले, तरी वर्षाला ते १२० टक्क्यांच्या घरात जाते. मूळ रकमेपेक्षा व्याजाचीच रक्कम दुप्पट-तिप्पट होते. एकदा या चक्रात अडकलेला माणूस आयुष्यभर केवळ व्याज फेडण्यातच व्यस्त राहतो. व्याज वेळेवर न दिल्यास चक्रवाढ व्याज लावून कर्जदाराला आणखी गाळात ढकलले जाते.अमानुष वसुली आणि धमक्यापैसे वसूल करण्यासाठी हे खाजगी सावकार गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

कर्जदाराच्या घरावर जाणे, महिलांना अपशब्द वापरणे, मारहाण करणे आणि घराला कुलूप लावण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या मानसिक त्रासाला कंटाळून अनेक कर्जदार नैराश्यात गेले आहेत, तर काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.कागदपत्रांवर बेकायदेशीर ताबासावकार कर्ज देताना सुरक्षितता म्हणून कर्जदाराचे एटीएम कार्ड, कोरे धनादेश, जमिनीची कागदपत्रे किंवा सोन्याचे दागिने स्वतःकडे गहाण ठेवून घेतात. कर्जदाराच्या खात्यावर पगार किंवा शेतीचे पैसे जमा होताच सावकार स्वतः एटीएममधून पैसे काढून घेतात.

यामुळे कर्जदाराच्या हातात घरखर्चासाठीही पैसे शिल्लक राहत नाहीत.प्रशासकीय कारवाईची गरजया वाढत्या त्रासामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आणि सहकार विभागाने अशा अवैध सावकारांवर कठोर मोहीम उघडून कडक कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

—अवैध सावकारांवर जामखेड तालुक्यात छापे .—

—————–

जामखेड तालुक्यात अवैध सावकाराच्या कागदपत्रांसह तक्रारी दाखल झाल्या होत्या .त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया ,पोलिस अधीक्षक मुम्मका सूदर्शन विभागीय निबंधक संभाजी निकम,जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे ,सहायक निबंधक दिलीप तिजोरे व पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या समन्वयाने विविध पथके तयार करून २२ जणांच्या संयुक्त पथकाने तालूक्यात तीन ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे .अचानक पडलेल्या छाप्यामुळे अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली .छाप्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे ,धनादेश खरेदीखते आर्थिक नोंदी असलेल्या वह्या असे साहित्य ताब्यात घेऊन पुढील तपासणी चालू केली आहे .

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215


बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!