Homeव्हिडिओ बातम्याखर्डा जामखेड रोडवर एसटी अपघात टळला ,ड्रायव्हरचे प्रसंगावधान ; प्रवाशांनी मानले आभार
खर्डा जामखेड रोडवर एसटी अपघात टळला ,ड्रायव्हरचे प्रसंगावधान ; प्रवाशांनी मानले आभार
जामखेड खर्डा रोडवर बसची दूर्घटना टळली
ड्रायव्हरचे प्रसंगावधान ; प्रवाशांनी मानले आभार !
जामखेड प्रतिनिधी
खर्डा-जामखेड रस्त्यावरील गोलेकर लवण येथे एसटी बस आणि कारचा होणारा भीषण अपघात एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे होणारा मोठा अपघात टळला आहे. चालकाने ऐनवेळी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एसटीमधील अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.या धाडसी कामगिरीबद्दल तुळजापूर -शिरूर बसचे चालक भाऊसाहेब पवार यांचे प्रवाशांनी आभार व्यक्त केले तसेच सर्वत्र कौतुक होत आहे.
तुळजापूर, शिरूर या एसटी बसचा अपघात थोडक्यात होता होता टळला त्यावेळी प्रवासी घाबरूले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘तुळजापूर शिरूर’ ही एसटी बस दुपारी ४ वाजेच्या सुमारास खर्डा-जामखेड रस्त्यावरून प्रवाशांना घेऊन चालली होती. सदर बस खर्डा पासुन दोन की मी वरील गोलेकर लवण येथील पुलाजवळ आली असता, सिताराम गड येथून नवीन रस्त्याने आलेली एक ‘होंडा अमेझ’ कार अचानक रस्ता ओलांडताना (क्रॉसिंग करताना) थेट एसटी बसच्या समोर आडवी आली. एसटी चालकाचे प्रसंगावधान आणि थरारक बचावः- कार अचानक समोर आल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, एसटी बसचे चालक भाऊसाहेब पवार यांनी जराही वेळ न घालवता कमालीचे प्रसंगावधान राखले. कारला होणारी भीषण धडक टाळण्यासाठी त्यांनी तातडीने ब्रेक दाबला आणि बस उजव्या बाजूला वळवली.
बस थेट रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला गेली आणि सुरक्षितपणे थांबली. चालकाच्या या तातडीच्या निर्णयामुळे होंडा अमेझ कारला होणारी धडक तर टळलीच, शिवाय एसटी बसमधील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित राहिले. प्रवाशांकडून कौतुकाचा वर्षाव:-चालक भाऊसाहेब पवार यांनी ऐनवेळी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एक मोठा जीवघेणा अपघात टळला.
परंतु कारचालक त्या ठिकाणाहून निघून गेल्याचे प्रत्यक्ष दर्शनीने सांगितले. अपघात टळल्याचे समजताच बसमधील प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आणि चालक पवार यांचे आभार मानत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!