सरपंचाविरूध्द अविश्वास ठराव दाखल करून सदस्य अज्ञातस्थळी
जामखेड प्रतिनिधी
खर्डा ग्रामपंचायतच्या भाजपच्या सरपंच सौ.संजीवनीताई पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव करण्याच्या हालचालींना वेग आला असून १३ ग्रामपंचायत सदस्य अज्ञातस्थळी गेले असल्याची माहिती मिळाली आहे .
ग्रामपंचायत सत्ता मिळवण्यासाठी भाजपा राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे .एका टर्ममध्ये खर्डा ग्रामपंचायतला आता तिसरा सरपंच मिळणार आहे .
खर्डा ग्रामपंचायतच्या मागील झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आली होती त्यावेळी सौ. नमिता आसाराम गोपाळघरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरपंचपदी यांची निवड झाली त्यानंतर त्यांच्या अंतर्गत निवडणुकीत सरपंच नमिता गोपाळघरे यांनी राजीनामा दिला.त्यावेळी राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी झाल्या आणि माजी मंत्री आ प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा ग्रामपंचायत भाजपाला ताब्यात घेण्यात यश आले . भाजपच्या सरपंचपदी संजीवनीताई पाटील यांची निवड झाली.आता पुन्हा भाजपच्या नाराज ग्रामपंचायत सदस्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य यांनी मिळून सरपंच सौ.संजीवनीताई पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आणला आहे .त्या अनुषंगाने १३ खर्डा ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करून सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना झाल्याने खर्डा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घडामोडीवर भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रवी सुरवसे म्हणाले की, कोणी कितीही पळाले तरी आ प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा ग्रामपंचायतचा विश्वास दर्शक ठराव भाजप नक्कीच जिंकेल .