Homeव्हिडिओ बातम्याखर्डा ग्रामपंचायतचे विभाजन उच्च न्यायालयाचा निकाल नागोबाचीवाडी दरडवाडी होणार स्वतंत्र ग्रामपंचायत

खर्डा ग्रामपंचायतचे विभाजन उच्च न्यायालयाचा निकाल नागोबाचीवाडी दरडवाडी होणार स्वतंत्र ग्रामपंचायत

 

खर्डा ग्रामपंचायतचे विभाजन

उच्च न्यायालयाचा निकाल

नागोबाचीवाडी, दरडवाडी या नवीन ग्रामपंचायती येणार अस्तित्वात

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या खर्डा ग्रामपंचायतीच्या विभाजनाच्या दीर्घकालीन लढ्याला अखेर यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (संभाजीनगर) खंडपीठाने राज्य सरकारला येत्या दोन आठवड्यांत विभाजनाची अंतिम अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे आता नागोबाचीवाडी आणि दरडवाडी या दोन नवीन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात येणार आहेत. प्रशासकीय सोय आणि खर्डा शहराच्या विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या
खर्डा ग्रामपंचायतीचा भौगोलिक विस्तार खूप मोठा होता. या ग्रामपंचायत हद्दीत मुंगेवाडी, नागोबाचीवाडी, गवळवाडी, गितेवाडी, पांढरेवाडी आणि दरडवाडी अशा सहा वाड्यांचा समावेश होता. गावातील अंतर तब्बल १३ किलोमीटरपर्यंत असल्याने ग्रामस्थांना प्रशासकीय कामांसाठी मोठी
ग्रामपंचायत कार्यालय
कसरत करावी लागत होती.

वाढती लोकसंख्या आणि विकासाचा समतोल राखण्यासाठी करण्यात येत असलेली विभाजनाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.

या विभाजनासाठी नाशिक विभागीय आयुक्तांनी सकारात्मक शिफारस करूनही, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामविकास विभागाने
मान्यता नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव फेटाळला होता. शासनाच्या या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

अखेर न्यायालयाने शासनाचा तो आदेश रद्द ठरवून १५ दिवसांच्या आत नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
या विभाजनामुळे खर्डा शहराच्या राजकारणात मोठा
बदल होणार असून, विस्तारित भौगोलिक क्षेत्रामु‌ळे रखडलेल्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या नागोबाचीवाडी आणि दरडवाडी या ग्रामपंचायतींमुळे त्या हद्दीतील वाड्यांचाही विकास साध्य होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खर्डा शहर, गवळवाडी, नागोबाचीवाडी, मंगेवाडी, दरडवाडी, पांढरेवाडी आणि गितेवाडी येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी याचिकाकर्ते मदन गोलेकर पाटील, शिवपट्टण विकास युवा मंचचे कार्यकर्ते गणेश ढगे, ओंकार इंगळे, बाबू गटकळ, ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे, श्रीकांत लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!