Homeव्हिडिओ बातम्याखरात नंतर आदर्श.... ! आता तर कमालच झाली १० वी नापसने स्वत:ला...

खरात नंतर आदर्श…. ! आता तर कमालच झाली १० वी नापसने स्वत:ला शास्त्रज्ञ आधिकारी भासवुन महिला व तरूणींचे लैंगिक शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 खरात नंतर आदर्श..!

आणखी एक भोंदू बाबा खरात आलाय…!

आता तर कमालच झाली…!

 स्वतःला शास्त्रज्ञ आणि डॉक्टर भासवून सुशिक्षित महिलांचं केलं लैंगिक शोषण…!

जामखेड प्रतिनिधी

नवी मुंबई परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला असून यामध्ये एका २१ वर्षीय तरुणाने अनेक सुशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केलंय.

आदर्श म्हात्रे असं या आरोपीचं नाव असून तो फक्त १० वी पास असतानाही त्याने समाजात स्वतःची एक खोटी आणि प्रतिष्ठित ओळख निर्माण केली होती. त्याने स्वतःला कधी शास्त्रज्ञ कधी डॉक्टर तर कधी मोठा शासकीय अधिकारी भासवून अनेक महिलांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे या भामट्याने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तब्बल १२ महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला असून, त्याच्या या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलात आणि समाजात मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपी आदर्श म्हात्रे याने सुशिक्षित महिलांना फसविण्यासाठी ‘मॅट्रिमोनी’ या विवाह जुळवणी संकेतस्थळाचा आधार घेतला होता. तो प्रामुख्याने खूप शिकलेल्या आणि चांगला पगार असलेल्या महिलांना आपले लक्ष्य बनवत असे.

त्याने या वेबसाईटवर स्वतःची एक नव्हे तर तब्बल १२ वेगवेगळी प्रोफाईल्स तयार केली होती. या प्रत्येक प्रोफाईलमध्ये तो आपली नवी आणि उच्चभ्रू ओळख सांगत असे. यामध्ये तो स्वतःला कधी शास्त्रज्ञ, कधी नामांकित डॉक्टर, कधी मोठा सनदी अधिकारी तर कधी बँकेतील उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे भासवत असे. या खोट्या प्रतिमेच्या जोरावर तो सुशिक्षित तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असे आणि त्यांना लग्नानंतरची सुखी स्वप्ने दाखवून आपल्याकडे आकर्षित करत असे.

तपासादरम्यान असंही समोर आलं आहे, की तो या तरुणींशी सतत ‘फ्लर्ट’ करत असे आणि त्यांच्याशी लग्न करण्याचं खोटं आश्वासन देऊन त्यांची मनं जिंकत असे. लग्नानंतर तुमची जीवनशैली अतिशय उच्च दर्जाची असेल असं सांगून त्याने अनेक महिलांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर त्याने लग्नाच्या नावाखाली अनेक मुलींकडून मोठ्या प्रमाणात पैसेही उकळल्याचे समोर आले आहे. या आरोपीविरोधात केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर अशा महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून आरोपी आदर्श म्हात्रे याला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यानंतर आता पुणे पोलिसांनी या आरोपीला आपल्या ताब्यात घेतले असून त्या ठिकाणच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची कोठडी मिळवली आहे. त्याने अशाच प्रकारे आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे आणि या आर्थिक फसवणुकीचा आकडा किती मोठा आहे, याचा सखोल तपास आता पुणे पोलिसांकडून केला जात आहे. एका १० वी पास तरुणाने अत्यंत नियोजनबद्ध रितीने उच्चशिक्षित महिलांना जाळ्यात ओढल्यामुळे आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!