Homeव्हिडिओ बातम्याखचलेल्या दरडवाडी पुलावरून पुराचे पाणी :जामखेड खर्डा मार्ग पून्हा बंद :घुलेवाडी तलाव...

खचलेल्या दरडवाडी पुलावरून पुराचे पाणी :जामखेड खर्डा मार्ग पून्हा बंद :घुलेवाडी तलाव फूटण्याची शक्यता : नांदणी नदीला महापुर : नान्नज सोनेगाव खर्डा मार्ग बंद

खचलेल्या दरडवाडी पुलावरून पुराचे पाणी : जामखेड खर्डा मार्ग बंद:
घूलेवाडी तलाव फुटण्याची शक्यता:
नांदणी नदीला महापुर :

खर्डा शहारात पाणी:

जवळा परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यातील सर्व तलावात पाणी वाढ सतत होत आहे. घूलेवाडी तलाव फुटण्याची शक्यता आहे. लोणी गावात नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे लोणी आनंदवाडी तसेच खालील गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
जवळा येथे नांदणी नदीला महापुर आला आहे. पुलाच्या काही उंचीवरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे.

खर्डा नान्नज मार्ग सोनेगाव जवळ पाण्यामुळे बंद आहे. जामखेड खर्डा मार्ग दरडवाडी जवळ खचलेल्या दरडवाडी पुलावरून पुराचे पाणी असल्याने बंद आहे.
प्रवाशांनी व नागरिकांनी सतर्क राहावे.

प्रशासनाने नागरिकांना संबधित घटनांची माहिती देणे व सतर्क करण्याची गरज आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!