Homeव्हिडिओ बातम्याआर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी,  पोलीस...

आर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी,  पोलीस स्टेशनला तक्रार दाखल 

 

आर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी,
पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

जामखेड प्रतिनिधी

बेकायदा कलाकेंद्र बंद केल्यामुळे आर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फीर्यादी गणेश अभिमान भानवसे रा. वांगी. ता. करमाळा, हल्ली रा. गणेशनगर, नगररोड, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दि २९फेब्रुवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी बीड जिल्ह्य़ातील उदंडवडगाव येथील विनापरवाना चालत असलेल्या जगदंबा कलाकेंद्रा विरोधात दि २६ जानेवारी रोजी बीड चे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी सदरचे कलाकेंद्र बंद केले आहे.

यानंतर दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सायं६. ३०वाजे सुमारास माझ्या मोबाईल नंबरवर भागिदारीत असलेले कलाकेंद्र चालक गुलशन हिरामन अंधारे रा. जामखेड यांनी त्यांच्या मोबाईल वरुन फोन आला.

व म्हणाले की, तु आमचे बीड तालुक्यातील कलाकेंद्र बंद करण्याबाबत बीड येथील पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज का दिला.असे म्हणुन शिवीगाळ केली तसेच तु जामखेड मध्ये कसा रहातोस ते बघतो तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

याच अनुषंगाने फीर्यादी गणेश अभिमान भानवसे रा. वांगी. ता. करमाळा, हल्ली रा. गणेशनगर, नगररोड, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दि २९ फेब्रुवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुलशन हिरामन अंधारे यांचे विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!