Homeव्हिडिओ बातम्याआकाश बाफना यांच्या माध्यमातून जामखेडच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध- बाबुसेठ टायरवाले प्रभाग...

आकाश बाफना यांच्या माध्यमातून जामखेडच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध- बाबुसेठ टायरवाले प्रभाग क्रमांक ४ मध्ये विकीभाऊ सदाफुले शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार

 

आकाश बाफना यांच्या माध्यमातून जामखेडच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – बाबुसेठ टायरवाले

विकीभाऊ सदाफुले प्रभाग क्रमांक अ ४ चे अपक्ष उमेदवार शिवसेनेने केले पूरस्कृत

सौ पायलताई आकाश बाफना विकासाचे व्हिजन असलेले उमेदवार – डॉ शबनम इनामदार

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही आमदारांकडून अनेक इच्छुकांची उमेदवारीबाबत निराशा झाली. प्रभाग क्रमांक ४ मध्ये सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांची ऐनवेळेस भाजपाकडून उमेदवारी नाकारली गेली मात्र त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला होता. भाजपावर नाराज झालेले विकीभाऊ सदाफुले यांना प्रभाग क्रमांक ४ मधुन शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुसेठ टायरवाले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूसेठ टायरवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत जामखेड येथे सौ पायलताई आकाश बाफना यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख डॉ. शबनम इनामदार, तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवा नेते आकाश बाफना, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ पायलताई बाफना, संतोष वाळुंजकर, बभ्रुवान वाळुंजकर, शामीरभाई सय्यद, नितीन कोल्हे, ऋषिकेश बांभरसे, शिवाजी विटकर, शिवकुमार डोंगरे, अँड प्रदिप बोलभट, आण्णा ढवळे यांच्या सह सर्व शिवसेना उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना विकीभाऊ सदाफुले म्हणाले की सभापती प्रा राम शिंदे यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही.मला डावलुन ऐनवळी आयात उमेदवाराला उमेदवारी दिली. मी अपक्ष लढणार आहे आता शिवसेनेने मला पुरस्कृत केले आहे. आम्ही एकत्रितपणे शिवसेनेची ताकद निवडणुकीत दाखवुन देऊ.

यावेळी बोलताना आकाश बाफना म्हणाले की  विकीभाऊंचा तिकडे अपमान झाला मात्र शिवसेनेत त्यांना सन्मान आहे. शिवसेना त्यांच्यापाठीशी ठामपणे आहे. जामखेड शहराच्या सर्वागिण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत नगरपरिषदवर शिवसेनेची सत्ता आणू. यावेळी डॉ शबनम इनामदार म्हणाल्या की नगरपरिषद निवडणूक अनुशंगाने एकत्रित आलो आहोत. शहराच्या विकासाची लाईफ लाईन शहराचा नगराध्यक्ष व नगरसेवक ठरवत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमांतून जामखेड शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्यासाठी विकासाचे व्हिजन असलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पायलताई आकाश बाफना व शिवसेनेचे सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून द्यावे. असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या अहिल्यानगर जिल्हा प्रमुख डॉ शबनम इनामदार यांनी केले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!