Homeव्हिडिओ बातम्याअल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीला मोठे यश; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी सकारात्मक चर्चा...

अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीला मोठे यश; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी सकारात्मक चर्चा उपोषण स्थगित करण्याचे आवाहन; हेट स्पीच ,जातीय द्वेष ,धार्मिक हिंसाचार बंद करा .

अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीला मोठे यश; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी सकारात्मक चर्चा

उपोषण स्थगित करण्याचे आवाहन;

 हेट स्पीच ,जातीय द्वेष ,धार्मिक हिंसाचार बंद करा .

जामखेड प्रतिनिधी

 महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजावरील वाढत्या अन्याय ,अत्याचार ,हेट स्पीच ,माँब लिंचिंग ,जातीय द्वेष ,धार्मिक हिंसाचार  घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री सुमित्राताई अजित पवार यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आ. सना मलिक, नजीब मुल्ला यांनी पाठपुरावा केला तर , आ. अबु आझमी, अमीन पटेल आदींचा पाठिंबा मिळाला .

—————————–

संरक्षण संघर्ष समिती, महाराष्ट्राचे निमंत्रक अॅड. प्रा. इलियास इनामदार यांनी या मागणीसाठी २२ जुन रोजी आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण सुरू केले होते. आंदोलना दरम्यान अल्पसंख्याक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र मुख्यमंत्री अथवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाशी तरी थेट चर्चा झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका समितीने घेतली होती.लवकरच या गंभीर विषयावर सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांनी सांगितले .

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!