अंत्यविधीसाठी अडविणे या घृणास्पद घटना थांबवा :- आकाश बाफना
कोरेगाव, पाटेवाडी घटनेचा जामखेडला निषेध :

जामखेड प्रतिनिधी
कोणाचाही अंत्यविधी अडविणे हे घृणास्पद व माणुसकीला न शोभणारी दूर्दैवी बाब आहे. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील महिलेचा नंतर कोरेगाव येथील ७४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचा अंत्यविधी करण्यास गावातील लोकांनी विरोध केला.
अंत्यविधी करण्यास रोखणे अशा घृणास्पद कृत्य वारंवार घडत आहे. कोणात्याही माणसाचा अंत्यविधी रोखण्याच्या अशा घटना प्रशासनाने थांबवाव्यात अशी घटना परत घडणार नाही अशी प्रशासनाने ग्वाही द्यावी अशी मागणी यूवा उद्योजक व आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी केली.
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे
७४ वर्षाच्या लिंगायत समाजाच्या महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी गावातील काही धनाड्या लोकांनी विरोध केला असल्याची दूर्दैवी घटना घडली या घटनेचा जामखेडमध्ये आदर्श फाऊंडेशन व लिंगायत समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी आकाश बाफना बोलत होते. या घटनेचा जामखेडकरांच्या व लिंगायत समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी लिंगायत समाज व आदर्श फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार पांडूळे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले पु विरोध करणारयांवर कारवाई करण्याबाबतचेही निवेदन देण्यात आले. यावेळी आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना बोलत होते.
यावेळी आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना, विरशैव तालुकाध्यक्ष बजरंग सरडे, शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष जामखेड शहरप्रमुख नागेश झाडबुके, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा,
उपाध्यक्ष राहुल लोहकरे, वीरशैव लिंगायत समाज सचिव अनिल लोहकरे, जगदिश मेनकुदळे,महेश नगरे,अनिल लोखंडे,दत्तात्रय चह्राटे ,अनिल लोहकरे, प्रमोद काथवटे, रतन मुळे, गणेश गवसने, अनिल लोखंडे,किरण भांगे, सुनिल ओझर्डे, विजय डोंगरे,हरेश्वर स्वामी, ,सुरज तोडकर,महेश कस्तुरे, संतोष गुळमिरे, प्रशांत गुळवे सागर लोहकरे आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
