समस्त ड्रायव्हरचा महाराष्ट्र बंद:
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र वाहातुक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत माने , संस्थापक उपाध्यक्ष दीपक लावरे, महाराष्ट्र वाहतूक अध्यक्ष श्री. रुपेश भाऊ धारैया, महिला महाराष्ट्र वाहतूक अध्यक्ष सीमाताई शिंदे, कोकण प्रदेश अध्यक्ष राजू दादा सावंत. महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि ९ जानेवारी रोजी रात्री पासून महाराष्ट्र बंद पुकारला आहे .या बंदमध्ये वाहन
जेथे आहे तेथेच उभे करून स्टेरिंग छोडो आंदोलन करण्यात येत आहे. ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेने पत्राद्वारे कळविले आहे .
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो नवीन नियम चालू केला आहे. महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यास ड्रायव्हर घटनास्थळा वरून पसार झाल्यास ७ लाख दंड व १० वर्ष कारावासाचा नियम चालू केला आहे. हा नियम ड्रायव्हर भावांना मान्य नाही. हा नियम रद्द करण्यासाठी ९ जानेवारी रात्री १२.०० वाजल्यापासून वाहन आहे बंद ठेवून शांततेत बंद करण्यात येत आहे .जे तरी सर्व शेतकरी वर्ग वाहनधारक (प्रायव्हेट कार, रिक्षा, दूध, भाजी, गॅस) इतर सर्व वाहने बंद राहतील यांनी दक्षता घ्यावी त्यामध्ये फक्त रुग्ण वाहिका आणि स्कूल बस सोडण्यात येतील बाकी कोणालाही नाही. तरी संस्था सभासद आणि पदाधिकारी आणि ड्रायव्हर बंधूंना यांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे आंदोलन ठिकाण असेल (तालुका. जिल्हा) म्हणजे जाळपोळ, नाही तोडफोड, नाही कोणताही अतिरेक न करता. शांतपणे आंदोलन करावी अशी विनंती पत्राद्वारे केली आहे .आपला लढा सरकारशी आहे जनतेशी नाही. याची सर्व पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांनी दक्षता घ्यावी. आणि आम्हाला सहकार्य करावे, आणि सर्व पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावे अशी नम्र विनंती पत्रामध्ये केलेली आहे .