Homeआरोग्यभाजपा नेते,आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. संजय भोरे मित्र मंडळाच्या...

भाजपा नेते,आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. संजय भोरे मित्र मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी: शेकडो रुग्णांनी घेतला लाभ:

जामखेड प्रतिनिधी

सनराईज एज्युकेशन फौंडेशनचे अध्यक्ष व प्रयत्न हाॅस्पिटलचे संचालक डॉ. संजय भोरे हे सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहतात.
भाजपा नेते तथा आ .प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. संजय भोरे मित्रमंडळाच्या वतीने देवदैठण येथे दि ३१ डिसेंबर रोजी सकाळी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीराचा ११७ रूग्णांनी लाभ घेतला यावेळी सनराईज एज्युकेशन फौंडेशनचे अध्यक्ष तसेच प्रयत्न हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय भोरे यांनी सर्व रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषधोपचार केले या शिबीरात रक्तदाब व सांधेदुखी चे ८०% रूग्ण आढळून आले त्यातील ९०% रूग्णांना आपणास रक्तदाब आहे हे माहीत नव्हते.
डॉ. संजय भोरे हे सन १९९२ पासून म्हणजे ३१ वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या प्रयत्न हॉस्पिटल मार्फत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक वर्षापासून सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधोपचार देत आहेत.
याबरोबरच सामाजिक काम म्हणून माजीमंत्री आ. प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून देवदैठण व पंचक्रोशीतील शेतकरी व सर्व सामान नागरीकांची अनेक वैयक्तिक व सार्वजनिक कामे करत असतात.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!