सर्व आरोपी जामखेडचे
सिटीझन न्युज – यासीन शेख
नाकाबंदी तोडुन पळून जाणारे दरोड्याच्या तयारीतील ६ आरोपींना
स्कॉर्पिओसह ताब्यात घेण्यात मिरजगाव पोलिसांना यश आले आहे. संशयीत चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही लोक स्कॉर्पिओ गाडीतून येत दरोडा टाकण्याच्या तयारीत असून ते मिरजगाव येथील क्रांती चौकातून आष्टीकडे जाणार आहेत. त्यानुसार दिवटे यांनी दि ३० डिसेंबर रोजी पोलीस नाईक गणेश ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर अंग्रे, सुनिल खैरे, राहुल सपट यांना घेऊन क्रांती चौक येथे नाकाबंदी केली. त्यावेळी कोकणगावचे दिशेने एक संशयीत स्कॉर्पिओ येताना दिसताच त्यास थांबण्यासाठी हात केला. मात्र त्याने नाकाबंदी तोडून स्कॉर्पिओ कडा मार्गाने पळवली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन तिखी गावाचे शिवारात स्पीड ब्रेकरवर ती स्कॉर्पिओ थांबवून त्यामधील इसमांना नावे विचारली. त्यांनी त्यांची नावे संतोष प्रभाकर खरात, वय २७ वर्षे, रा. भटेवाडी, ता. जामखेड, विशाल हरिष गायकवाड, वय २० वर्षे, रा. मिलींदनगर, जामखेड, आकाश रमेश गायकवाड, वय २१ वर्षे, रा. गोरबा टॉकीज,
जामखेड, किरण अजिनाथ गायकवाड, वय २३ वर्षे, रा. मिलींदनगर, जामखेड, रवि शिवाजी खवळे, वय २२ वर्षे, रा. मिलींदनगर, जामखेड, संतोष शिवाजी गायकवाड, वय ३० वर्षे रा. मिलींदनगर, जामखेड अशी सांगितली.
पोलिसांनी स्कॉर्पिओची झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी सुरा, दोन लोखंडी गज, एक बांबुचे दांडके, मीरची पावडर, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनला कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा सखोल तपास केला असता मंगल कार्यालयाचे सीसीटीव्ही तपासले असता आरोपींचे फोटो मिळते जुळते दिसून आले. अधिक चौकशी केली असता आरोपींनी मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आत्मरामगिरी लॉन्स, मांदळी, शिवपार्वती मंगल कार्यालय, थेरगाव येथे गुन्हे केल्याची कबुली दिली. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध कलम
३७९ अन्वये गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ९ ग्रॅम वजनाचे सोने, २४ हजार रुपये रोख व स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे सर्व आरोपी जामखेड मधील आहेत.
डीवायएसपी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक फौजदार सुनिल माळशिखरे, एस.एन. भताणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. आय. गव्हाणे, पोलीस नाईक गणेश ठोंबरे, विकास चंदन, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल खैरे, गोकुळदास पळसे, गंगाधर अंग्रे, राजेंद्र गाडे, राहुल सपट यांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे सर्व आरोपी जामखेड मधील आहेत.