Homeव्हिडिओ बातम्याडॉ. विक्रम साराभाई शैक्षणिक सहल परिक्षा केंद्रात गडबड ल.ना होशिंग केंद्रातील...
डॉ. विक्रम साराभाई शैक्षणिक सहल परिक्षा केंद्रात गडबड ल.ना होशिंग केंद्रातील घटना महिला शिक्षिकेने दुजाभाव /अन्याय ?? चौकशीची विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, पालक विद्यार्थ्यांनी केली चौकशीची मागणी .
डॉ. विक्रम साराभाई शैक्षणिक सहल परिक्षा केंद्रात गडबड
ल.ना होशिंग केंद्रातील घटना
महिला शिक्षिकेने दुजाभाव /अन्याय ??
चौकशीची विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, पालक विद्यार्थ्यांनी केली चौकशीची मागणी .

जामखेड प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा, विज्ञान व संशोधनाची आवड निर्माण व्हावी, कुतूहल व शोधवृत्ती निर्माण व्हावी यासाठी डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा केरळ येथे शैक्षणिक सहलीसाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हयात रविवारी ३६ केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
परंतू जामखेड तालुक्यातील जामखेड केंद्रावर या परीक्षेत मोठी गडबड झाल्याचा आरोप परिक्षार्थी विदयार्थी, पालक, घोडेगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे .
सदर परीक्षेबाबत चौकशी करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे केली आहे.याबाबत माहीती अशी की, सदर सहलीबाबत ची परीक्षा जामखडे केंद्रावर दि.४/१०/२६ रोजी घेण्यात आली.
सदर परीक्षेमध्ये घोडेगांव गावातील विद्यार्थी प्राजल शंकर भोंडवे, सोनम राजू शेख, सनम इकबाल सय्यद, प्राजक्ता गणेश नलवडे हे विदयार्थी परीक्षा केंद्र ल ना होशिंग विद्यालय जामखेड या ठिकाणी ब्लॉक क्रमांक १५ मध्ये परीक्षे साठी बसलेले होते.
तरी सदर ब्लॉक व परीक्षेसाठी ज्या सुपरवायझर महिला शिक्षिकेची नेमणूक केलेली होती त्यांनी त्यांनी सदर ब्लॉक मध्ये आसन क्रमांक ३५६ या ठिकाणी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नाची उत्तरे जाणीवपूर्वक सांगितली असून त्यामुळे ब्लॉक मधील बाकी विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय झाला आहे.
तरी सर्व सदर ब्लॉक मध्ये बसविण्यात आलेला सी -सी. टी. व्ही कॅमेरयांचे फुटेज तपासून झालेल्या गैर प्रकाराची चौकशी करावी .घडलेला प्रकार गंभीर असून संबंधित महिला सुपरवायझर वर योग्य व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ घोडेगाव येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे .गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर विदयार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.
——–(–
आसन क्र. ३५६ वरिल परिक्षार्थीचे आई-वडील शिक्षक असल्याचे समजते. त्यामुळेच सदर अन्यायी कटकारस्थान झाले. याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!