Homeव्हिडिओ बातम्याराम शिंदे यांची राजकीय खेळी जिल्हा बँक मतदार देवदर्शनासाठी / सहलीला...

राम शिंदे यांची राजकीय खेळी जिल्हा बँक मतदार देवदर्शनासाठी / सहलीला रवाना ?

राम शिंदे यांची राजकीय खेळी

जिल्हा बँक मतदार देवदर्शनासाठी / सहलीला रवाना ?

सिटीझन प्रतिनिधी

मतदारांना देवदर्शन’ ही निवडणूक राजकारणात वापरली जाणारी एक राजकीय खेळी किंवा प्रलोभन आहे.

निवडणुका जवळ आल्यावर मतदारसंघामध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार किंवा राजकीय पक्ष मतदारांसाठी मोफत देवदर्शन सहलींचे आयोजन करतात.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला असून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सहकार क्षेत्रातील आपली ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे.

कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत ठराव असलेल्या मतदारांच्या बैठका घेतल्यानंतर मतदारांना सहलीसह देवदर्शनासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.कर्जत शहरातील महाराजा मंगल कार्यालयात आज, बुधवारी कुळधरण व राशीन गटातील मतदारांची सभापती राम शिंदे यांनी बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीला सुमारे २२ मतदार उपस्थित होते, अशी माहिती मिळाली. यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडी, संभाव्य समीकरणे आणि पुढील रणनीतीबाबत मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे समजते.

बैठकीनंतर उपस्थित मतदारांना वातानुकूलित वाहनांमधून सहलीसह देवदर्शनासाठी पाठवल्याची माहिती मिळाली. तसेच मंगळवारी कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील अलंकार मंगल कार्यालयात सुमारे ३३ मतदारांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनानंतर या मतदारांनाही सहलीसह देवदर्शनासाठी पाठवल्याची माहिती समोर आली आहे.कर्जत तालुक्यात सेवा सहकारी मतदारसंघातील एकूण ७५ मतदारांपैकी ५७ मतदार राम शिंदे यांच्या संपर्कातून सहलीला गेल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे.

या संख्येमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यातील मतदारांचे गणित कोणत्या दिशेने झुकत आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!