Homeव्हिडिओ बातम्याअबब! सर्व सदस्य निवडी रद्द ! कोणाच्या सल्ल्याने जम्बो सल्लागार सदस्य...

अबब! सर्व सदस्य निवडी रद्द ! कोणाच्या सल्ल्याने जम्बो सल्लागार सदस्य निवडी अन् कोणाच्या दबावाने रद्द ?? मुख्याध्यापकांची बदली ?? अशा -अशा लोकांच्या निवडी? जामखेड मध्ये नागेश शाळेची चर्चा

अबब! सर्व सदस्य निवडी रद्द !

कोणाच्या सल्ल्याने जम्बो सल्लागार सदस्य निवडी अन् कोणाच्या दबावाने रद्द ??

मुख्याध्यापकांची बदली ??

अशा -अशा लोकांच्या निवडी?

जामखेड मध्ये नागेश शाळेची चर्चा

 

सिटीझन न्यूज प्रतिनिधी

जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय सल्लागार /समन्वय समिती सदस्यपदी नूकतीच निवड झालेल्या सर्व सदस्यांच्या निवडी रद्द करण्यात आल्या आहेत .तसे मुख्याध्यापकांच्या सहिने शाळेच्या वतीने पत्र काढण्यात आले आहे .अशा-अशा लोकांच्या सल्लागार सदस्य म्हणून निवडी केल्याचे एकामागून एक असे तब्बल ५२ पत्र वाटण्यात आले .जसजसे संख्या वाढली तशी त्या पदाचे महत्व कमी झाल्याचे जाणवले .

शालेय सल्लागार / समन्वय समिती निवड झालेल्या
सर्व सदस्यांना कळविण्यात आले आहे की नागेश विद्यालयाच्या शालेय सल्लागार / समन्वय समिती च्या सदस्य पदी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ते २०२८-२९ या तीन वर्षासाठी निवड करण्यात आलेली होती परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे सदर समितीची निवड रद्द करण्यात येत आहे.
त्यामुळे सदर समितीच्या सदस्यांनी यापुढे समितीच्या नावाने कोणतेही अधिकृत कामकाज अथवा निर्णय घेऊ नयेत. पुढील कार्यवाहीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे पत्र मुख्याध्यापकांच्या सहिने काढण्यात आले आहे .
जामखेड मधील एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे तब्बल ६ ७ जणांची श्री नागेश विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समन्वय समितीच्या सदस्यपदी निवडी करण्यात आल्या होत्या .तसे निवडीचे पत्र प्रत्येकाला देण्यात आले होते .

पत्र मिळालेल्या सदस्यांचे अभिनंदन, सत्कार सुरू झाले .शोसलमिडियावरुन अभिनंदन सुरू झाले.माध्यमातुन बातम्या लागल्या .मात्र एवढ्या मोठ्या संख्येने सल्लागार निवडीमागे काय उद्देश ?. अशा- अशा लोकांची नावे सल्लागार म्हणून कोणी कोणी सुचविले? मुख्याध्यापकांनी स्वतः निवडली की कोणाच्या सांगण्यावरून निवड केल्या ? याबाबत चर्चा सुरू झालीच होती .लगेच वरिष्ठ पातळीवरून मुख्याध्यापकावर नाराजी व्यक्त केली गेली.

.मुख्याध्यापकांनी सर्व सदस्य निवडी रद्द करण्यात येत असल्याचे पत्र काढले.मात्र एवढ्यावरच विषय थांबला नाही तर मुख्याध्यापकाची लगेच बदली करण्यात आली आहे असे समजते. मुख्याध्यापक कोणाच्या रोषाचे बळी ठरले ?  राजकीय की प्रशासकीय बदली झाली ? हा चर्चेचा विषय झाला आहे .

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!