Homeव्हिडिओ बातम्यादारू बंदीचा ठराव मंजूर अर्जुन जाधवला यापुढे ठेकेदारी /काम नाही ...

दारू बंदीचा ठराव मंजूर अर्जुन जाधवला यापुढे ठेकेदारी /काम नाही गावाच्या विविध प्रश्नांवर चर्चा: एसटी स्टँडसह अनेक ठराव /निर्णय रखडले नान्नजची ग्रामसभा संपन्न ;

दारू बंदीचा ठराव मंजूर

अर्जुन जाधवला यापुढे ठेकेदारी /काम नाही
गावाच्या विविध प्रश्नांवर चर्चा:
एसटी स्टँडसह अनेक ठराव /निर्णय रखडले
नान्नजची ग्रामसभा संपन्न ;

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील नान्नज हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे .दि २६ आँगस्ट रोजी नान्नज ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती .

यावेळी गावाच्या विकासासाठी विविध विषयांवर चर्चा होत असतांना ग्रामस्थांमध्ये मतमतांतरे ऐकायला मिळाले वेगवेगळ्या मतांमुळे काही निर्णय रखडले तर काही ठराव मंजूर करण्यात आले.
गावातील अनधिकृत दारू व्यवसाय, जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे, पाणीटंचाई, सार्वजनिक चावडीसाठी जागा तसेच विकासकामांच्या ठेकेदारीबाबत ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर काही महत्त्वाच्या विषयांवर ठराव मंजूर करण्यात आले.

गावात सुरू असलेला अनधिकृत दारू व्यवसाय बंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. तसेच गावामध्ये कोणाकडूनही जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे अथवा किरकोळ कारणावरून गाव बंद करण्यासारखी परिस्थिती निर्माण करणे यास विरोध दर्शवून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.

नान्नज गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

तसेच गावातील सार्वजनिक चावडीसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. गावाच्या सार्वजनिक कामांसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या ठेकेदारीबाबतही ग्रामसभेत चर्चा झाली. वादग्रस्त ठेकेदार अर्जुन जाधव यांना यापुढे काम न देता इतरांना काम देण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेत मांडला.त्यावर चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आला.

या प्रमुख विषयांसह गावातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर ग्रामस्थांनी आपापली मते मांडली. काही विषयांवर एकमत झाले, तर काही मुद्द्यांवर मतमतांतरे झाल्याने निर्णय होऊ शकला नाही.

विशेष म्हणजे, नान्नज येथील एसटी स्टँडच्या प्रश्नावर कोणताही ठोस निर्णय न घेता ग्रामसभा समाप्त करण्यात आली. त्यामुळे एसटी स्टँडचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या प्रश्नावर पुढील काळात काय निर्णय घेतला जाईल का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

या ग्रामसभेस प्रशासक, माजी सरपंच प्रभावती मोहळकर, ग्रामविकास अधिकारी जी. एस. पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत विविध विषयांवर झालेली चर्चा आणि मंजूर झालेले ठराव प्रत्यक्षात कितपत अंमलात येतात, याकडे आता नान्नज ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!