Homeव्हिडिओ बातम्याआश्वासन नको कारवाई करा - सचिन आजबे ,कायदेशीर कलाकेंद्राबाबत सचिन आजबेंचे ...

आश्वासन नको कारवाई करा – सचिन आजबे ,कायदेशीर कलाकेंद्राबाबत सचिन आजबेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण उपोषणाचा पाचवा दिवस ;प्रशासन ढिम्म

आश्वासन नको कारवाई करा – सचिन आजबे

कायदेशीर कलाकेंद्राबाबत सचिन आजबेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण

उपोषणाचा पाचवा दिवस ;प्रशासन ढिम्म

जामखेड प्रतिनिधी

अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजबे यांनी जामखेड शहरालगत असलेली बेकायदेशीर कलाकेंद्र व त्यातील बेकायदेशीर धंदे बंद करावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे .
उपोषणाचा पाचवा दिवस आहे .संबधित प्रशासन मात्र ढिम्मपणे वागत असल्याचे दिसून येते आहे . सचिन आजबे च्या उपोषणाची दखल घेतली नाही तर या उपोषणास तीव्र स्वरुप येईल असे पाठींबा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले .
सदर उपोषणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते .जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक जामखेड यांना ३० जूलै रोजी पत्र पाठवून सचिन आजबे यांच्या तक्रारींची नोंद घेऊन उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी पत्राद्वारे कळविले होते .मात्र जामखेड प्रशासनावर सचिन आजबे यांचा विश्वास राहिलेला नाही .यापूर्वी अनेक वेळा सदर अवैध्य कलाकेंद्र व त्या कलाकेंद्रातील अवैध्य व्यवसायाबाबत सचिन आजबे यांनी लेखी तोडी तक्रारी केल्या .उपोषणं केले .

अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजबे यांनी जामखेड शहरालगत असणारे बेकायदेशीर कलाकेंद्रे व जामखेड मधील बेकायदेशीर धंदे बंद करणे बाबत जो पोटतिडकीने व सामाजिक परंपरा जपण्यासाठी जो अर्ज दिला होता त्याची अद्यापपर्यंत कोणतीही दखल किंवा कार्यवाही झालेली नाही .

बेकायदेशीर कलाकेंद्रे व बेकायदेशीर धंद्यामुळे जामखेड मधील सर्व धर्माच्या तरूण पिढीवर तसेच जामखेडच्या नावाजलेल्या बाजारपेठेवर वाईट परिणाम होत आहे. सदर बेकायदा कलाकेंद्रांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने सदर कलाकेंद्रावाले व बेकायदेशीर धंदा करणारे धनधांडके (आर्दांड) लोकांचा आत्मविश्वास वाढत चालला आहे. आमच्या विरूद्ध कितीही व कसल्याही तक्रारी दिल्या तरी आमचे काहीच वाकडे होत नाही व होणारही नाही. कारण आमचे बरोबर सरकारी अधिकारी व त्यांचे आर्थिक हित संबंध आहेत. असा पक्का समज या बेकायदेशीर चालविणारे कलाकेंद्राचे मालक व बेकायदेशीर धंदेवालेंचा झालेला आहे.

म्हणून हे लोक बिनधास्त
पणे कोणालाही न भिता राजरोसपणे वावरताना दिसत आहे.
मात्र जामखेड प्रशासनाने आश्वासन पलिकडे कसलीही कारवाई केली नाही .त्यामुळे सचिन आजबे यांनी पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे .
या उपोषणाची दखल जिल्हाधिकारी कार्यालय कधी घेणार व अवैध्य कलाकेंद्रांबाबत काय निर्णय देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!