रूग्णांनी शासकीय वैद्यकीय योजनांचा लाभ घ्यावा : आ सुरेश धस . रुग्णांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळणे आवश्यक आहे :- प्रांजल चिंतामणी .जामखेडमध्ये श्री समर्थ हाडांचा दवाखाना व एम आर आय सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न
या उद्घाटन समारंभास लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी, सामाजिक कार्यकर्ते संजय (काका) कोठारी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, पै. बबन (काका) काशिद, नगरसेवक प्रविण सानप, नगरसेवक श्रीराम डोके, नगरसेवक आशोक शेळके, माजी पाणीपुरवठा सभापती अमित चिंतामणी, सुनील कोठारी, राहुल उगले, नगरसेवक गणेश डोंगरे,माजी नगराध्यक्ष विकास (तात्या) राळेभात, हाडांचे तज्ज्ञ डॉ. अजय शिरसागर, एम.डी. मेडिसिन तज्ज्ञ डॉ. वैभव हुंबे, हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे व डॉ. सोनाली दारकुंडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गरीब रुग्णांच्या उपचारासाठी विविध शासकीय आरोग्य योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. साई समर्थ हॉस्पिटलनेही या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवावा. अनेक महागड्या शस्त्रक्रियाही शासनाच्या योजनांमधून मोफत होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना या योजनांची माहिती देणे आणि त्यांचा लाभ मिळवून देणे हीदेखील रुग्णालयाची सामाजिक जबाबदारी आहे. जामखेड नगरपरिषदेत स्वतंत्र वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची गरज असून त्याचा फायदा अनेक गरजू नागरिकांना होईल. मदत करण्यासाठी माणुसकी आवश्यक असते आणि ती डॉ. भरत दारकुंडे यांच्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळणे ही काळाची गरज आहे. साई समर्थ हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे आता अनेक रुग्णांना किरकोळ तसेच हाडांच्या उपचारांसाठी नगर किंवा पुणे येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. डॉ. भरत दारकुंडे यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतले आहे, असेही त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यामुळे त्यांना कमी खर्चात आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे हे हॉस्पिटल जामखेड व परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रुग्णांना अत्याधुनिक, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर सुरू करण्यात आले असून, या रुग्णालयामुळे जामखेडसह परिसरातील हजारो रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.
RELATED ARTICLES






