कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी जलद आणि सुलभ न्यायदान प्रक्रियेला गती मिळणार पक्षकार ,नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार
RELATED ARTICLES
या निर्णयाचे अहिल्यानगरवासीयांतर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत असून माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांचे आभार मानण्यात येत आहेत. शनिवार, दिनांक 25 जुलै, 2026 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी कर्जत तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. कैलास शंकरराव शेवाळे, उपाध्यक्ष ॲड. दत्तात्रय चव्हाण, सचिव ॲड. अविनाश मते, ॲड. सचिन रेणुकर, ॲड. संदिप पाटील यांच्या शिष्टमंडळाने सभापती महोदयांची भेट घेऊन या संदर्भात विनंती केली होती.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांनी, मुख्यमंत्री महोदयांना या मागणीबाबत अवगत केले जाईल आणि पाठपुरावा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज लगेच याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटने मंजूर केल्याने गतिमान निर्णय प्रक्रियेचा अनुभव अहिल्यानगर जिल्हावासीयांना आला. कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यान्वीत होत असल्याने जलद आणि सुलभ न्यायदान प्रक्रियेला गती मिळणार आहे. कर्जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय निर्माण करण्याबाबतच्या या निर्णयाचे विधिक्षेत्रातील मान्यवर तसेच प्रलंबित खटल्यांसंदर्भातील याचिकाकर्ते, अर्जदार यांनी स्वागत केले आहे. 
या निर्णयामुळे जामखेड कर्जत तालुक्यातील पक्षकार नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे .त्यामुळे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215