Homeव्हिडिओ बातम्या"मटका" आकडा कधी फूटत नाही पण "पेपर" वारंवार फूटतो ; शोकांतिका सिस्टमची...

“मटका” आकडा कधी फूटत नाही पण “पेपर” वारंवार फूटतो ; शोकांतिका सिस्टमची दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ जामखेड कडकडीत बंद प्रस्थापित नेत्यांची दांडी,पण सामान्य माणसाची ‘निष्ठा’! शिक्षण सर्वांची गरज मग शिक्षणातील अनिष्टा च्या निषेधात सर्व का नाही ?!

‘मटका’ आकडा कधी फूटत नाही पण पेपर वारंवार फूटतो ; शोकांतिका सिस्टमची

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ जामखेड कडकडीत बंद

प्रस्थापित नेत्यांची दांडी,पण सामान्य माणसाची ‘निष्ठा’!

शिक्षण सर्वांची गरज मग शिक्षणातील अनिष्टा च्या निषेधात सर्व का नाही ?!

जामखेड प्रतिनिधी –

पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात पेपर फुटीसारख्या अनिष्ट घटना वारंवार घडत आहेत .आणि विद्यार्थ्यांची कष्ट ,मेहनत वाया जाते .याला जवाबदारी शासन आहे.बेजबाबदारपणाचा, मनमानीचा कळस गाठलेल्या सरकारला लोकशाही मार्गाने विचारणा करत न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी अमानुष लाठीमार केला गेला या घटनेच्या निषेधार्थ जामखेड कडकडीत बंद पाळण्यात आला .

निषेधार्थ
मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ;चिमुकलीचे पोस्टर आणि सामान्य विक्रेत्याचा सहभाग चर्चेचा विषय ठरला .
दिल्लीतील प्रसिद्ध जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड .बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.शहरातील व्यापारी,व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःहून आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून या आंदोलनाला अभूतपूर्व पाठिंबा दर्शविला.भव्य व शांततापूर्ण मोर्चा:-सकाळी १०:०० वाजता जामखेड एस.टी.बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चामध्ये:सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,युवक-युवती, महिला आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी मोर्चेकऱ्यांनी संविधान,लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करत अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आपला तीव्र निषेध नोंदवला.

‘माझे भविष्य धोक्यात…’चिमुकलीच्या पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष:-या मोर्चातील सर्वात भावनिक आणि लक्षवेधी क्षण ठरला तो म्हणजे आपल्या भावी पिढीच्या सुरक्षेसाठी सहभागी झालेली एक लहान चिमुकली! तिच्या हातात “I SUPPORT SONAM WANGCHUK SIR (Because My Future Is in Danger)” असा संदेश लिहिलेले पोस्टर होते. या चिमुकलीच्या शांत पण प्रभावी संदेशाने उपस्थितांच्या मनाला थेट भिडले आणि शिक्षण व भवितव्याबद्दलची चिंता उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली.नेत्यांची दांडी,पण सामान्य माणसाची ‘निष्ठा’!
या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. जामखेडमधील काही प्रस्थापित राजकीय नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याची चर्चा शहरात रंगली असली,तरी रोज खारमुरे विकून आपला उदरनिर्वाह करणारे ‘गणेश’हे सर्वसामान्य नागरिक विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी मोर्चात हिरीरीने सहभागी झाले होते.

“एका दिवसाच्या कमाईपेक्षा देशाची लोकशाही आणि विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे!”— गणेश (स्थानिक खारमुरे विक्रेते)त्यांचा हा त्याग आणि सहभाग संपूर्ण शहरासाठी अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरला. तहसीलदारांना निवेदन सादर
मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर विविध प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने शासनाच्या नावे तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कोठारी, मुस्लिम पंच कमिटी चे अझहरभाई काझी,संभाजी ब्रिगेडचे अवधूत पवार,मनसे नेते प्रदीप टाफरे, शिवसेनेचे ॲड.मयुर डोके,प्रहार चे नय्युम सुभेदार,आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, आदिवासी नेते प्रकाश काळे, लोकाधिकार आंदोलन प्रवक्ते बापूसाहेब ओव्होळ,इस्माईल सय्यद, आंबेडकरी चळवळीचे नेते विकी सदाफुले, सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मण ढेपे, रमेश आजबे,माजीद कुरेशी,रवि शेळके,माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, मुकुंद घायतडक, रंजित मेघडंबर,नगरसेविका संगीता भालेराव, नगरसेवक वसिम सय्यद,नगरसेवक प्रशांत राळेभात,प्रा.कुंडल राळेभात,ॲड.हर्षल डोके, जुबेर शेख, सरपंच बाळासाहेब खैरे,बापूसाहेब कार्ले, मच्छिंद्र जाधव,सचिन शिंदे, गणेश हगवणे,ॲड.बाळासाहेब घोडेस्वार, हरिभाऊ आजबे,प्रा.धनंजय भोसले ,स्वप्निल खाडे, रजनी औटी,सुरज भालेराव,ऋषिकेश गायकवाड,सागर कांबळे,विकी पिंपळे, विशाल जाधव,पिंटू जाधव, नितीन जाधव आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोज मटका लावतात लोक हा मटका आकडा फुटला तर कीतीतरी गरीब लोक श्रीमंत होतील .पण मटका आकडा कधी फूटत नाही पण बंदोबस्तात असलेला पेपर फुटतो ही सिस्टीमचा शोकांतिका आहे .अशा भावना मोर्चाकरांनी व्यक्त केल्या .विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,”लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपले हक्क मागण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिला आहे, तो अबाधित राहिलाच पाहिजे.” सामाजिक ऐक्याचे दर्शन:- जामखेडमधील हा बंद आणि मोर्चा अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडला.सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत दाखवलेली ही एकजूट जामखेड शहराच्या सामाजिक ऐक्याचे आणि संविधानाप्रती असलेल्या विश्वासाचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!