Homeव्हिडिओ बातम्याएसआयआर (SIR) सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : बीएल ओंनी फार्म...

एसआयआर (SIR) सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : बीएल ओंनी फार्म न वाटता घरोघरी जाऊन भरून घ्यावे : राजकीय ,सामाजिक संघटन,माहितीवान लोकांनी बीएलओ – नागरिकांमध्ये दूआ बनावे : राष्ट्रीय काम ,पुण्याचे काम समजून लोकांची मदत करावी:

एसआयआर (SIR) सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा :
बीएल ओंनी फार्म न वाटता घरोघरी जाऊन भरून घ्यावे :

राजकीय ,सामाजिक संघटन,माहितीवान लोकांनी बीएलओ – नागरिकांमध्ये दूआ बनावे :

राष्ट्रीय काम ,पुण्याचे काम समजून लोकांची मदत करावी:

जामखेड प्रतिनिधी
सध्या जामखेड मध्ये एसआयआर चे काम सर्वत्र सुरू आहे .बीएलओ यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरीकांचा फार्म भरून घेण्याचे काम सुरू केले आहे .मात्र काही बीएलओ नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाचे फार्म हातामध्ये देऊन भरून आणा असे सांगत आहेत .नागरिकांना फार्म कसा भरायचा माहीत नाही .फार्म भरण्यासाठी इकडे तिकडे चौकशी करत नागरिक फीरतांना दिसत आहेत .
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून सहभागी व्हावे आणि २९ जुलै २०२६ पूर्वी आपली माहिती अचूकपणे नोंदवावी , असे आवाहन शासनाकडून होत आहे . हे सर्वेक्षण ३० जूनपासून सुरू असून, प्रत्येक पात्र नागरिकाने वेळेत आपली माहिती सादर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
सध्याच्या काळात प्रत्येक नागरिकासाठी आपली ओळख आणि शासकीय नोंदी अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. विविध शासकीय योजना, सुविधा आणि प्रशासकीय कामकाजामध्ये कागदपत्रांची अचूकता आवश्यक असते. त्यामुळे एसआयआर सर्वेक्षणाच्या प्रक्रियेकडे केवळ औपचारिकता म्हणून न पाहता, भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी केवळ स्वतःची माहिती भरून थांबू नये, तर नातेवाईक, शेजारी आणि परिसरातील इतर नागरिकांनाही या सर्वेक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्याचे आवाहन केले आहे. विशेषत, ज्येष्ठ नागरिक, महिला, अल्पशिक्षित व्यक्ती, दिव्यांग नागरिक तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना सर्वेक्षणाची प्रक्रिया समजावून सांगून त्यांना आवश्यक ती मदत करावी, जेणेकरून कोणताही पात्र नागरिक माहिती नोंदविण्यापासून वंचित राहणार नाही. माहिती नोंदविताना सर्व तपशील काळजीपूर्वक तपासूनच सादर करावेत. चुकीची किंवा अपूर्ण माहिती भविष्यात विविध शासकीय प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता शासनाच्या सूचनांनुसार सर्वेक्षण पूर्ण करावे. सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी संस्थांनी जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना अंतिम मुदत संपण्यापूर्वी एसआयआर (SIR) सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आणि समाजातील गरजू व माहितीपासून वंचित असलेल्या नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन आहे. नागरिकांनी समजत नसतांना चुकीची माहिती अर्जामध्ये भरू नये .आपल्या प्रभागातील माहिती असलेले राजकीय सामाजिक नेते ,शासकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन अर्ज भरून देण्याची विनंती करावी.सदर राष्ट्रीय कार्यक्रमात मोलाचे योगदान पुण्याचे काम समजून सर्वच सुज्ञ समझदार नागरिकांनी लोकांना या कामत मदत करावी .

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!