Homeव्हिडिओ बातम्याचार सख्ख्या बहिणी एकाचवेळी पोलीस दलात ,ऊसतोड कामगाराच्या मुलींची गगनभरारी .कष्टकरी आईवडीलांच्या...

चार सख्ख्या बहिणी एकाचवेळी पोलीस दलात ,ऊसतोड कामगाराच्या मुलींची गगनभरारी .कष्टकरी आईवडीलांच्या आनंदाला आकाश ठेंगणे .तरूण तरुणींना प्रेरणादायी सक्सेस स्टोरी

४ सख्ख्या बहिणी एकाचवेळी मुंबई पोलिस दलात दाखल .

ऊसतोड कामगाराच्या मुलींची गगनभरारी 

कष्टकरी आईवडीलांच्या आनंदाला आकाश ठेंगणे

.तरूण तरुणींना प्रेरणादायी सक्सेस स्टोरी 

जामखेड प्रतिनिधी

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण बीड जिल्ह्यातील चार सख्ख्या बहिणींनी घालून दिले आहे. ऊसतोड कामगार कुटुंबातील या चारही बहिणींनी एकाचवेळी मुंबई पोलिस दलात भरती होऊन आपल्या कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
बीड जिल्ह्यातील जिवाचीवाडी गावातील हनुमंत चौरे हे ऊसतोड कामगार आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण देत मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या या संघर्षाचे फळ आता मिळाले असून उषा, अर्चना, गीतांजली आणि शितल चौरे या चारही सख्ख्या बहिणींची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे .कष्टकरी आईवडीलांच्या आनंदाला आकाश ठेंगणे वाटत आहे .राज्यभरातील तरूण तरुणींना प्रेरणादायी सक्सेस स्टोरी ठरत आहे .

डोंगराळ भागात वसलेल्या जिवाचीवाडीसारख्या गावात मुलींच्या शिक्षणापेक्षा लवकर लग्नाला प्राधान्य दिले जाते. मात्र चौरे कुटुंबाने या परंपरेला छेद देत मुलींना शिक्षण आणि करिअरची संधी दिली. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक संकटांचा सामना करत चारही बहिणींनी आपले ध्येय गाठले.


आई-वडील आजही ऊसतोडणीचे काम करत असताना मुलींनी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे केवळ कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण गावाला अभिमान वाटत आहे.

चारही बहिणींची एकाचवेळी मुंबई पोलिस दलात निवड होणे ही दुर्मिळ आणि प्रेरणादायी घटना मानली जात आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाने ग्रामीण भागातील अनेक मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आज चौरे कुटुंबाचा संघर्ष यशात बदलला असून, या चार बहिणींची यशोगाथा बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण तरुणींना प्रेरणादायी ठरत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!