Homeव्हिडिओ बातम्याखबरदार....! तसले, व्हिडिओ व्हायरल केले तर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल! विशेष...

खबरदार….! तसले, व्हिडिओ व्हायरल केले तर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल! विशेष तपास पथकाचा (एस आय टी ) इशारा

खबरदार…! ‘तसले’ व्हिडिओ व्हायरल कराल तर…! पोलीस कारवाईला सामोरे जावं लागेल…! 

विशेष तपास पथकाचा (एस.आय.टी.) इशारा…!

 

जामखेड प्रतिनिधी

सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार आहे. सोशल मिडियाचा सदुपयोग केला तर समाजात चांगल्या आणि ज्ञानवर्धक बाबींची देवाण-घेवाण होते.मात्र याच सोशल मीडियाचा दुरुपयोग केला तर सामाजिक शांतता धोक्यात येते.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. एखाद्याच्या चारित्र्याचं हनन होतं. किंबहुना एखाद्या घरंदाज व्यक्तीची अब्रू वेशीवर टांगली जाते. त्यामुळे नाशिकच्या विशेष पथकाने (एस.आय.टी.) राज्यातल्या सर्व न्यूज चॅनल, यूट्यूब चॅनल आणि न्यूज पोर्टलच्या संपादक आणि पत्रकारांमार्फत एक पत्रक प्रसिद्ध दिलं आहे. सदरच्या पत्रकात इंस्टाग्राम व्हाट्सअप फेसबुक या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातल्या पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या पत्रकात म्हटलं आहे, की भोंदू बाबा अशोक खरातविरुद्ध नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे तब्बल आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या सर्वच गुन्ह्यांचा तपास नाशिकच्या विशेष पथकाकडून (एस.आय.टी.) सुरु आहे. या तपासादरम्यान असे निदर्शनास आलं आहे, की या गंभीर प्रकरणातल्या महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगावच्या BMW या व्हाट्सअप ग्रुपवर काल (दि. २५) राहुल गंगाधर शिंदे (अनिल कोल्ड्रिंक्स कोपरगाव) याने मोबाईलवरुन (मो. नं. ९९६०१५९५) पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले आहेत. या संदर्भात पोलिसांनी अधिक तपास केला असता राहुल शिंदे याला सदरचे व्हिडिओ योगेश पंढरीनाथ आढाव (रा. कोपरगाव) याने (मो. नं. ९४२९६४०२७४) याने पाठवले असून योगेश आढावला ते व्हिडिओ त्याचा मित्र संदीप गर्जे (राहणार – माजलगाव बीड) याने त्याच्या मोबाईलवरुन (मो. नं. ९९२३४७७५५६) पाठवले असल्यास पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण खूप गंभीर आणि संवेदनशील असून या प्रकरणात अनेक पीडित महिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित कुठल्याच महिलेची ओळख उघड होणार नाही, याची पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सर्वांना असं आवाहन करण्यात येत आहे, की कोणाकडेही पीडित महिलेची ओळख, तिच्या नातेवाईकांची, तिच्या घराची ओळख, तिच्या कुटुंबाची ओळख उघड होईल, असे व्हिडिओ किंवा अश्लील व्हिडिओ असल्यास ते तात्काळ ‘डिलिट’ करावे. असे व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रसारित करु नये. असे व्हिडिओ प्रसारित केल्यास संबंधिताविरुद्ध आणि संबंधित प्रसारमाध्यमाच्या ग्रुप ॲडमिनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात येईल.पत्रकार

 यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!