Homeव्हिडिओ बातम्याबुडनशहावली बाबांचा संदल उत्साहात साजरा: नंदकुमार गायकवाड यांच्या वतीने तीन दिवस...

बुडनशहावली बाबांचा संदल उत्साहात साजरा: नंदकुमार गायकवाड यांच्या वतीने तीन दिवस मोफत सर्व भक्तांना चहापाणी वाटप पिंपरखेडला हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक

बुडनशहावली बाबांचा संदल उत्साहात साजरा:

नंदकुमार गायकवाड यांच्या वतीने तीन दिवस मोफत सर्व भक्तांना चहापाणी वाटप

पिंपरखेडला हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील सय्यद बुडनशाहवली यांची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. जाती पातीच्या भिंती तोडून मानवता धर्माची शिकवण देणारे अवलिया संत म्हणजे सय्यद बुडनशहावली बाबा होय.माद्य पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून या संदलला सुरुवात होते.

तीन चालणारया या यात्रेमध्ये सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गायकवाड यांच्या वतीने सामाजिक जाणीवेतून सर्व येणारया जाणार्या भाविक भक्तांना मोफत चहा पाणी वाटप करण्यात आले. नंदकुमार गायकवाड यांच्या या सामाजिक उपक्रमांचे ११ वे वर्षे आहे. यात्राकाळात बाहेरगावी असलेले सर्व क्षेत्रातील, सर्वजाती धर्माचे लोक गावात येतात. नंदकुमार यांच्या चहा स्टाँलवर येतात. एकमेकांना भेटत चहा घेत मनमोकळ्या गप्पा होतात. एकमेकांच्या सुख दुःखाची माहिती घेतात.

नंदकुमार यांच्या मोफत चहापाणी या सामाजिक उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राजकीय सामाजिक सर्व स्तरातील मान्यवर आवर्जून भेट देऊन चहाचा आस्वाद घेतात.
सुमारे १०० वर्षापासून पिंपरखेड मधील या ऊरूसाच्या कार्यक्रमाची परंपरा असल्याचे नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले. तसेच या ठिकाणचा जिर्णोध्दार व्हावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

नंदकुमार गायकवाड यांच्या परिवाराकडून या यात्राउत्सवाच्यावेळी वर्षापासून दिवस सकाळी सरबत व रात्री चहाचे मोफत वाटप केले जाते. नंदकुमार गायकवाड यांच्याकडुन सामाजिक जाणीवेतून गेल्या ११ वर्षापासुन हा उपक्रम सुरू आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविक त्याचा मनोभावे अस्वाद घेतात.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकुमार गायकवाड,अशोक गायकवाड मधुकर गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन अशोक गायकवाड करण युवराज गायकवाड अरविंद गायकवाड सोनबा मस्के इसहाक शेख दादा पवार विशाल गायकवाड, संभाजी तुपेरे, नाना काळे, अविनाश गायकवाड, सोमा गायकवाड, आदिंनी परिश्रम घेतले .

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!