Homeव्हिडिओ बातम्याजामखेडला गोळीबार ;याला कोण जवाबदार, जुन्या भांडणाचा राग, पोलिसांचा अंदाज, अद्याप गुन्हा...

जामखेडला गोळीबार ;याला कोण जवाबदार, जुन्या भांडणाचा राग, पोलिसांचा अंदाज, अद्याप गुन्हा दाखल नाही

जामखेडला गोळीबार
कोण जवाबदार

जुन्या भांडणाचा राग
पोलीसांचा अंदाज
अद्याप गुन्हा दाखल नाही.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात बीड रोडवरील हॉटेल कावेरी या ठिकाणी रात्री गोळीबार केला. चारचाकी वाहन व हॉटेलची तोडफोड केली. या गोळीबारात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार, वय २७ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. रात्री घटना घडली असुन अद्याप गून्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गोळीबार केला आसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जखमीला तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाले आसुन गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या जामखेड पोलीसांकडून सुरू आहे. या अशा घटनांवरून जामखेडचख कायदा व सुव्यवस्थेचा अंदाज येतो अशी नागरिकांमधून बोलले जात आहे.


याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की बुधवारी रात्री हॉटेल मालक रोहीत अनिल पवार हा हॉटेलवर गिर्‍हाईक पहात होता. यावेळी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ७ते ८ जणांच्या टोळीने हॉटेलवर हल्ला करीत हॉटेलची तोडफोड केली. तसेच जखमी रोहीत अनिल पवार, वय २७ वर्षे, कान्होपात्रा नगर, जामखेड, याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो या घटनेत गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी हॉटेल मालकाची चारचाकी गाडीची तोडफोड केली यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. आरोपी हल्ला करुन पळुन गेल्यानंतर घटनास्थळावरून जखमीस तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपासणी करतांना आजुबाजुचे काही सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आहेत. यामध्ये दोन संशयितांची नावे निष्पन्न झाले आहेत. घटनास्थळी अहिल्यानगर येथुन फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. घटनास्थळी गावठी कट्ट्याचे आवषेश सापले आहेत. सध्या जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!