विकासाची परिवर्तनाची लढाई आहे, शिवसेना वचन देते अन् पाळते धनुष्यबाणावर शिक्का मारा, जामखेड विकासाची जवाबदारी माझी” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. जामखेडच्या जनतेला एकनाथ शिंदेंचे आश्वासन
विकासाची, परिवर्तनाची लढाई आहे, शिवसेना वचन देते अन् पाळते.
धनुष्यबाणावर शिक्का मारा, जामखेड विकासाची जवाबदारी माझी” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जामखेडच्या जनतेला एकनाथ शिंदेंचे आश्वासन
जामखेड प्रतिनिधी.
मुख्यमंत्री म्हणून जे जे निर्णय घेतले. ते ठामपणे अमलात आणले. शिवसेना म्हणजे वचन आहे. जामखेड नगरपरिषद निवडणूकीत आपण सर्व जामखेडकर धनुष्यबाणावर मतदान करा आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पायलताई आकाश बाफना व शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे भरपूर मतांनी निवडून द्या जामखेडच्या विकासासाठी माझा शब्द, माझी जवाबदारी आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेडच्या जाहीर प्रचार सभेत जनतेला आश्वासन दिले.
सर्व समाज सर्व धर्माचे लोक शिवसेनेत एकत्र आले आहेत जामखेड विकासासाठी प्रस्थापितांविरुद्ध ही निवडणूकीची लढाई आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेडच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली. “ही परिवर्तनाची लढाई आहे. मुख्यमंत्री असताना मी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना कोणीही आले तरी बंद होणार नाही,” असे सांगत त्यांनी नागरिकांना विश्वास दिला. अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी असलेल्या जामखेडची “मक्तेदारी मोडण्याची वेळ आली आहे,” असेही ते म्हणाले. धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, जात-पात न पाहता धनुष्यबाणावर शिक्का मारा. जामखेडकरांनी कधी न पाहिलेला विकास मी करून दाखवणार आहे.मी आरोप-प्रत्यारोपांना कामाने उत्तर देतो , पण विकास मात्र नक्की करून दाखवतो.” शिंदे यांनी विविध योजनांचा उल्लेख करताना सांगितले की लाडकी बहीण योजना सुरूच राहील. ७० हजारांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी मदत दिली. एस.टी. प्रवासात महिलांना साठी ५० टक्के सवलत लागू केली उच्चशिक्षित मुलींची फी माफी केली.
जामखेड शहराचा डिपी प्लॅन, पाणीपुरवठा, गार्डन विकास, ड्रेनेज यासह विविध विभागांचे काम वेगाने पूर्ण करण्यात येणार” एकदा मी शब्द दिला की मग कोणाचं ऐकत नाही तो शब्द पूर्ण करूनच दाखवतो,” असे सांगून त्यांनी सभेत नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला.
ही लढाई सत्येची आहे. २ डिसेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून पायलताई आकाश बाफना या लाडक्या बहीणीला नगराध्यक्ष करा,” असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी
ज्योतीताई वाघमारे, उपनेते राजू वाघमारे, बाबूशेठ टायरवाले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. शबनम इनामदार, तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवा नेते आकाश बाफना, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पायलताई आकाश बाफना व शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व जामखेड मधील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!