आकाश बाफना जामखेडका सपना : – कैलास माने आम्ही कोणाच्याही दबावाला न घाबरता फक्त जामखेडच्या विकासासाठी निवडणूक लढत आहोत :- आकाश बाफना
आकाश बाफना जामखेडका सपना -कैलास माने
आम्ही कोणाच्याही दबावाला न घाबरता फक्त जामखेड विकासासाठी लढणार – आकाश बाफना
जामखेड प्रतिनिधी
दोन्ही महाशक्तींच्या दबावाचा उमेदवारी अर्ज दाखल करतांनाच अनुभव आला आहे. जामखेड नगरपरिषद निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करतांनाच दोन्ही महाशक्तीकडून शिवसेनेकडून नगरसेवक पदाच्या उमेदवारांवर उमेदवारी दाखल न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला व आमिष दाखवले त्यामुळे आमचा एबी फार्म घेऊनही त्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही. संपर्कातही राहिले नाहीत. यावरून या दोन्ही आमदारांचे नाव न घेता या महाशक्तींचा किती दबाव आहे हे जामखेडकराच्या लक्षात आणुन दिले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड विकासासाठी जामखेडचे सर्व शिवसैनिक आम्ही एकत्र आलो आहोत.
कोणाच्याही आमिषाला दबावाला घाबरणार नाही. फक्त आणि फक्त जामखेड शहराच्या विकासासाठी लढणार आहोत असे आकाश बाफना यांनी ठणकावून सांगितले. पायलताई आकाश बाफना यांनी नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदासाठी १८ जणांनी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने सर, युवा सेना तालुकाप्रमुख प्रविण बोलभट, शामीरभाई सय्यद, नितीन कोल्हे, संतोष वाळुंजकर, आण्णा ढवळे, दिनेश राळेभात, गणेश आजबे, किरण मराळ, विकी पिंपळे, शिवाजी विटकर, शिवकुमार डोंगरे, मोहन देवकाते, अँड प्रदीप बोलभट सह सर्व उमेदवार उपस्थित होते.
यावेळी पूढे बोलताना आकाश बाफना म्हणाले की आम्ही
२४ एबी फार्म वाटप केले पण महाशक्तींच्या दबावामुळे पाच जणांनी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्याने नगराध्यक्षपदासह १९ उमेदवार रिंगणात आहेत.
नगरपरिषद हद्दीतील जामखेड शहर पुर्ण फिरलो आहे. मोठी दूरावस्था झाली आहे. विकासाच्या नवीन पर्वासाठी काम करणार आहे लवकरच विकासाची ब्लु प्रिंट जनतेसमोर मांडणार आहे.
यावेळी शामीरभाई सय्यद म्हणाले की स्वतः धोरणात्मक निर्णय घेणारे कतृत्वान यूवक आकाश बाफना आपल्यासमोर आले आहेत. विकासाचे काम होणारच आहेत.
आम्ही सर्व आकाश बाफना यांच्याबरोबर शिवसैनिक म्हणून नगरपरिषद मध्ये सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहे.
यावेळी तालूकाध्यक्ष कैलास माने म्हणाले की जामखेड तालुक्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आकाशसेठबरोबर आहोत.
जामखेडच्या सर्वागिण विकासाची काम करणार आहे.
दिलिपसेठ बाफना यांनी १० वर्षे नेतृत्व केले. जिल्हा परिषदेत सभापती म्हणून काम करत पुरस्कारही मिळविला आहे. ऐकेकाळी “दिलीप बाफना जामखेड का सपना” अशी घोषणा ऐकली आहे “. आता आकाश बाफना जामखेडका सपना” ही विकासाची घोषणा होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे जामखेडच्या विविध विकासासाठी जास्त निधी उपलब्ध होणार आहे. जामखेड नगरपरिषदवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक आकाश बाफना यांच्या बरोबर एकत्रितपणे काम करणार आहेत.असे कैलास माने यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे
प्रभाग १-अ) रेखा मोहन देवकाते, ब) कु. अंजली उल्हास माने
प्रभाग २- अ) रेखा कीरण मराळ, ब) दिनेश रमेश राळेभात
प्रभाग ३ – अ) शिवाजी ज्ञानदेव विटकर ब)
—
प्रभाग ४- अ) नमशा फहिमोद्दीन शेख, ब) विकी सदाफुले.
प्रभाग ५- अ) विकी संतोष पिंपळे, ब) वर्षा कैलास माने.
प्रभाग ६- अ) पुजा अशोक सदाफुले ब) सोहेल जावेद शेख
प्रभाग ७ – अ) दत्तात्रय उर्फ (आण्णा) भिमराव ढवळे
ब)
प्रभाग ८- अ) शितल प्रदिप बोलभट
ब) शामिरभाई लतीफ सय्यद.
प्रभाग ९- अ)
ब) तारीफ फर्मान शेख.
प्रभाग १०- अ) जयओम जालिंदर टेकाळे
ब)
प्रभाग ११- अ) ऋषीकेश कीसन बांबरसे,
ब) गणेश उत्तम आजबे
प्रभाग १२ – अ) -ब) दोन्ही इच्छुकांनी एबी फार्म घेऊनही अर्ज दाखल केले नाहीत.
जे अपक्ष उमेदवार शिवसेनेकडे येण्यास इच्छूक आहेत त्यांना पुरस्कृत करणार आहोत.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!