खर्डा येथून चोरली ; आरोळे वस्ती करमाळा रोडवर पकडली
मोटारसायकल चोर जामखेड पोलीसांनी मुद्देमालासह पकडला
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरासह तालुक्यात चोरयांच्या प्रमाणात वाढ होत असतांना पोलीसांनी चोरांच्या मुसक्या बांधण्यासाठी रात्र गस्त चालू केली आहे.
जामखेड पोलीस आरोळे वस्ती करमाळा रोडवर रात्रीची गस्त घालत असताना मोटारसायकलस्वाराची नियमित चौकशी दरम्यान संशयावरून ताब्यात घेतले.
चौकशी केल्यावर त्याच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे लक्षात आल्यानंतर जामखेड पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याला अटक केली.
दि.१३ आँगस्ट रोजी पोकॉ देविदास सोपान पळसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार दि १२ रोजी रात्री ८ ते दि १३ रोजी सकाळी ८ वाजेपर्यत पोकॉ देविदास पळसे व चालक पोकॉ बी एस कडभणे हे डायल ११२ ड्युटी व शहरामध्ये पेट्रोलिंग करत होते.
रात्री १ वाजे सुमारास अरोळेवस्ती करमाळा रोड रात्र गस्त करीत असताना करमाळा रोडने एक मोटार सायकलस्वार रस्त्याने येताना दिसला. आम्ही त्यास थांबवून त्याचे नाव गाव व कोठुन कोठे चालला याबाबत विचारणा केली असता त्याने आम्हास उडवा उडवी उत्तरे दिली.
त्यानंतर सशंय बळावल्याने आम्ही त्याचे ताब्यातील मोटार सायकल चालवण्याचा परवाना व मोटार सायकलचे कागदपत्रे बाबत विचारणा केली असता त्याने माझेकडे परवाना व कागदपत्रे नसल्याबाबत सांगितल्याने आम्ही सदरची मोटार सायकल व सदर इसमास ताब्यात घेवून सदर घटनेबाबत रात्रगस्त पेट्रोलींग असणारे सहाय्यक फौजदार कदम व चालक पोकॉ एम.टी. मिसाळ यांना फोनद्वारे सदर घटनेबाबत माहीती देवून त्यांना बोलावुन घेतले.
लागलीच सफौ कदम यांनी दोन पंचाना बोलावून घेवून त्यांना हकीगत समजावुन सांगितली व पंचासमक्ष सदर इसमास विश्वासात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गौतम संजय पवार वय 20 वर्षे रा.आढळा ता. कळंब जि.धाराशिव असे सांगितले त्यास त्याचे ताब्यात असलेली मोटर सायकलचे मालकी हक्का बाबात विचारपुस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही.
त्यावेळी आमची खात्री झाली की, सदर मोटार सायकल सदर इसमाने लबाडीने मिळवलेली आहे. त्यावेळी पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात खालील वर्णनाचे मोटार सायकलची पंचा समक्ष पाहणी केली असता तिचे वर्णन खालील प्रमाणे.
४०,०००/- रुपये किंमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स काळे रंगाची त्यावर लाल पटटा
असलेली मोटरसायकल तिचा आर टी ओ नं MH-16-BB-5513 असा व तिचा चेसी नं.MBLHAR054J9H24368 तिचा इंजिन नं. HA11EPJ9H25787असा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याबाबत जामखेड पोलीस स्टेशनलागुन्हा रजि नं. ४६३/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम१२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे ताब्यात मिळून आलेली मोटार सायकल ही खर्डा गावातून चोरी केली असल्याचे सांगितले आहे. सदर बाबत खर्डा पोलीसांकडे चौकशी करून माहिती घेतली असता खर्डा पोलीस स्टेशनला गु. रजि.५०/२०२५भारतीय न्याय संहिता कलम २०२३चे ३०३(२)प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. असे जामखेड पोलिसांनी सांगितले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
