Homeव्हिडिओ बातम्याखुनासह इतर गुन्हे दाखल असलेल्या सागर मोहळकरची रवानगी नाशिक कारागृहात :जामखेड पोलीसांची...

खुनासह इतर गुन्हे दाखल असलेल्या सागर मोहळकरची रवानगी नाशिक कारागृहात :जामखेड पोलीसांची सतर्कता

खूनासह इतर गुन्हे दाखल असलेल्या सागर मोहळकरची रवानगी नाशिक कारागृहात

जामखेड पोलिसांची सतर्कता

जामखेडसह इतर ठिकाणी गून्हे दाखल
जामखेड प्रतिनिधी

नांगट व खुनशी प्रवृत्ती असलेल्या सागर मोहळकर या आरोपीबाबत जामखेड पोलीसांनी सतर्क होत जामखेड कारागृहात न ठेवता मा. न्यायालयाचे परवानगीने पोलीस बंदोबस्तात नासिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

  सदर आरोपी सागर दत्तात्रय मोहोळकर जामखेडचा रहीवाशी आहे. तो कोणत्याही प्रकारचा काहीएक कामधंदा करत नाही. तो अत्यंत नंगट, धाडसी व खुनशी वृत्तीचा आहे. तो त्याचे साथीदारांचे मदतीने लोकांमध्ये दहशत निर्माण करुन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करत असतो. यापूर्वी जेलमध्ये अटक असताना त्याने एका आरोपीचा खुन केला आहे. त्याचेवर जामखेडसह इतर ठिकाणी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) जामखेड पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर येथे २६४/२०१९ भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९,३३६,५०४ प्रमाणे
२)जामखेड पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर ४५८ / २०२१ भादंवि क. ३२६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे

३)जामखेड पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर

३६/२०२२ भादंवि क. ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे
४)पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे

२०८/२०२२ भादंवि क. ३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
जीवे मारण्याचा प्रयत्न, हत्याराने दहशत निर्माण करणे, खून अशा गंभीर गुन्हे असलेला
सागर मोहळकर फरार राहुन त्याचे अस्तित्व लपवत होता. त्याच्या अशा गुन्हे करण्याचे वृत्तीमुळे जामखेड तालुक्यात व परिसरात त्याची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्याचे पासून जनतेमध्ये भीती व धोका निर्माण झालेला होता.पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, प्रभारी अधिकारी जामखेड पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा आरोपी सागर मोहळकर हा सेव्हन फिटनेस जिम जामखेड येथे येणार आहे अशी बातमी मिळाल्याने  सपोनि. नंदकुमार सोनवलकर, पोसई. किशोर गावडे, पोहेकॉ प्रविण इंगळे, पो.ना. बाघ, पो.ना. सरोदे, पोकॉ घोळवे, पोकों पळसे, पोकॉ माने, पोकॉ दळवी, पोकॉ  बोराटे, पोकॉ बेलेकर, पोकॉ कोठुळे, यांचे पथक यांच्या पथकाने दिलेल्या सुचनेनुसार आरोपी सागर मोहळकर यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.
तो नांगट व खुनशी प्रवृतीचा असल्याने जामखेड कारागृहात न ठेवता मा. न्यायालयाचे परवानगीने पोलीस बंदोबस्तानिशी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवानगी केली आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी  केलेली आहे.

————–
जामखेड येथील फिर्यादी सलमान सुलेमान शेख, वय २९ वर्षे, रा.सदाफुलेवस्ती यांनी जामखेड पो.स्टे. ला तक्रार दिली होती दि.३०/५/२०२५ रोजी पहाटे ०५.३५ वा. चे सुमारास ते नेहमी प्रमाणे सेव्हन फिटनेस क्लब (जिम) पंचायत समिती समोर जामखेड येथे जिम करत असताना तेथे आरोपी सागर दत्तात्रय मोहळकर त्यांचे जवळ गेला व म्हणाला की, तु जिम मध्ये उशीरा का आला असे म्हणून फिर्यादी सुलेमान शेख यांना शिवीगाळ करून गालावर चापट मारली व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना कंबरेला धरून वर उचलुन डोक्यावर व मानेवर फरशीवर जोरात आपटुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215* 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!