प्रा सचिन गायवळ यांच्याकडून धाकटी (धनेगाव) पंढरीसाठी मोफत बस सेवा
आषाढी एकादशी निमित्ताने खर्डा नान्नज येथून मोफत ६ लक्झरी बस सेवा उपलब्ध
जामखेड प्रतिनिधी
सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रा.सचिन गायवळ यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्ताने धाकटी पंढरी (धनेगाव) येथे जाण्या येण्यासाठी रविवार दि ६ जूलै रोजी मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यासह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या मोफत बस सेवेचा लाभ घ्यावा असे नम्र अवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी केले आहे. 
गेल्या ३ वर्षापासून प्रा. सचिन गायवळ यांनी धाकटी पंढरी धनेगाव येथे जाण्यासाठी खर्डा ते धनेगाव व नान्नज ते धनेगाव या परिसरातील भाविक भक्तांसाठी मोफत बस सेवेचा उपक्रम सुरू केला आहे.
धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. परंतु अनेक भाविकांना पंढरपूरच्या दर्शनासाठी गर्दीमुळे जाता येत नाही, त्यामुळे पंढरपूर नंतर धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला धाकटी पंढरी समजले जाते.
त्यामुळे जामखेड तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक गावातील महिला व भावीक भक्त येथे दर्शनासाठी आषाढी यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात. परंतु एस.टी. महामंडळाच्या बसेस या खर्डा व नान्नज इथपर्यंतच येतात. त्यानंतरचा १५ किलोमीटरचा प्रवास भाविकांना खाजगी वाहन, मोटरसायकल किंवा पायी चालत जावून करावा लागत होता.
भाविकांना होणारा त्रास प्रा.सचिन गायवळ यांच्या लक्षात आला. कोणत्याही ठिकाणाहुन जामखेड मार्गे खर्डा नान्नज या ठीकाणी येता येते मात्र पुढे धनेगाव धाकटी पंढरीला जाण्यासाठी वाहन नसते. भाविकांची ही मोठी अडचण सोडविण्यासाठी प्रा सचिन गायवळ यांनी स्वखर्चातून खर्डा व नान्नज येथून धाकटी पंढरी पर्यंत मोफत बस सेवा चालू केली. नान्नज येथून २ लक्झरी बस सेवा व खर्डा येथील बस स्थानकापासून ४ चार बस अशा एकूण ६ लक्झरी बससेवा भाविक भक्तांसाठी सुरू केल्या आहेत.
गेली अनेक वर्षापासून सचिन गायवळ हे गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, तिळगुळ वाटप, शालेय साहित्य वाटप,दुष्काळात पिण्याच्या पाण्याचे टँकर, कोरोनाच्या काळात अडचणीत असलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा इत्यादी समाज सेवा करीत असताना अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांना मदत करणे तसेच इतर शासकीय योजनांचा गोरगरीब व गरजू लोकांना लाभ देण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात.
याबाबत दि.६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नान्नज व खर्डा बस स्थानका समोर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या बससेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त भावीक भक्तांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बससेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती प्रा.सचिन गायवळ सर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या सामाजिक उपक्रमाचे वयोवृद्ध, पुरुष, महिला लहान मुले यांना या मोफत बस सेवेमुळे भाविकांडुन कौतुक केले जात आहे. दर्शन घेण्यासाठी मोठा लाभ होत असल्याचे भाविक भक्तांकडून प्रा.गायवळांचे आभार व्यक्त जात आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

