Homeव्हिडिओ बातम्याआ रोहित पवार यांच्या गटाचे तीन संचालक सभापती प्रा राम शिंदे यांच्या...

आ रोहित पवार यांच्या गटाचे तीन संचालक सभापती प्रा राम शिंदे यांच्या गटात सामील :उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव दाखल : बाजार समितीत राजकीय उलथापालथ

आ रोहित पवार गटाचे तीन संचालक सभापती प्रा राम शिंदे यांच्या गटात सामील :
उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव दाखल

बाजार समितीत राजकीय उलथापालथ
जामखेड प्रतिनिधी

जामखेड प्रतिनिधी

आ रोहित पवार गटाचे तीन संचालकांनी सभापती प्रा राम शिंदे यांच्या गटात उडी मारली अन् आ रोहित पवार गटाचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.
या घटनेमुळे जामखेडच्या छत्रपती कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय उलथापालथीला सुरूवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीची दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली त्यामध्ये १८ जागांपैकी
आ रोहित पवार यांच्या गटाचे ९तर सभापती प्रा राम शिंदे यांचे ९ संचालक निवडून आले होते. यावेळी ईश्वर चिट्ठीने प्रा राम शिंदे गटाचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे पै शरद पंडित कार्ले हे सभापतीपदी तर उपसभापतीपदी आ रोहित पवार गटाचे कैलास वराट यांची निवड झाली होती. मागील दोन वर्षांमध्ये आ रोहित पवार गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेळोवेळी विकास कामांना अडथळा आणला असा आरोप केला आणि तालुक्यातील शेतकरी हिताचे कारण सांगत आ रोहित पवार गटाचे अंकुश ढवळे ,राहुल बेदमुथा व नारायण जायभाय या तीन संचालकांनी सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. दि ३० जून रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे आ रोहित पवार गटाचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. त्या ठरावावर १८ पैकी १२ संचालकांच्या सह्या  आहेत. या घटनेवरून बाजार समिती एक हाती भाजपाच्या हाती जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!