परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांचा पून्हा जामखेडकडे मोर्चा :
कृष्णा हाँटेल धडक कारवाई :
परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांच्या पथकाकडून गेल्या काही दिवसांपासून जामखेड शहरासह तालुक्यात अवैद्य व्यवसायावर धडक कारवाई चालूच आहे. दि २३ रोजी रात्री १०.४५ वाजता जामखेड शहरातील नगर रोडवरील हाँटेल कृष्णा वर धडक छापा टाकला.
या छाप्यात विनापरवाना ११०२५ रूपयांची देशी विदेशी दारू पकडण्यात आली. हाँटेल कृष्णा तुकाराम रामराव ढोले यांच्या मालकीचे आहे. पो काँ अमोल श्रीरंग आजबे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र राज्य दारू अधिनियम कलम ६५ नूसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग अहिल्यानगर, सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे,
पोसई/राजेंद्र वाघ, सफौ/शकील शेख, पोहेकॉ/शंकर चौधरी, पोहेकॉ/अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ/मल्लीकार्जुन बनकर, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ/दिगंबर कारखिले, पोहेकॉ उमेश खेडकर, पोकॉ/सुनिल दिघे, पोकॉ/अमोल कांबळे, पोकॉ/जालिंदर दहिफळे, पोकॉ/दिपक जाधव व पोकॉ/विजय ढाकणे यांचे पथकाने केली आहेत.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांच्या पथकाच्या जिल्हाभर कारवाया सूरू आहेत.
रात्री पून्हा संतोष खाडे यांनी जामखेडला मोर्चा वळवला आहे.संतोष खाडे यांच्या कधी पायी तर गाडीने करत असलेल्या धडक पेट्रोलिंगची मोठी चर्चा चालू आहे. शहरासह तालुक्यात अवैद्य व्यवसायिकांचे धाबै दणाणले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
