Homeव्हिडिओ बातम्यालोणी येथील स्कूल बस मोटारसायकल अपघात मोटारसायकलस्वार ठार ; एक जखमी...

लोणी येथील स्कूल बस मोटारसायकल अपघात मोटारसायकलस्वार ठार ; एक जखमी खर्डा पोलीसांच्या अक्षम्य चुका मृताच्या नातेवाईकांचा आरोप मृतदेह पोलीस ठाण्यात

लोणी येथील स्कूल बस मोटारसायकल अपघात
मोटारसायकलस्वार ठार ; एक जखमी:

खर्डा पोलीसांच्या अक्षम्य चुका मृताच्या नातेवाईकांचा आरोप:
मृतदेह पोलीस ठाण्यात:

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील लोणी येथे स्कुल बस (MH16 CD 7184) आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातातील जख्मी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. खर्डा पोलिसांकडून या प्रकरणात अक्षम्य चुका झाल्या आहेत. २४ मार्चला गुन्हा दाखल होऊनही स्पाँट पंचनामा केला नाही. तपासात दिरंगाई केली. आरोपी पळून गेला. स्कूल बस ड्रायव्हरवर खूनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी
संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह खर्डा पोलीस स्टेशनच्या आवारात आणून ठेवला.

यायबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील शेंडकर वस्ती लोणी येथे मोटरसायकल आणि स्कुल बसच्या अपघाताची घटना दि २४ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता घडली होती. या घटनेत यातील मृत तरूण बंजरंग बाबासाहेब जगदाळे वय ४५ वर्षे रा.वाकी ता. जामखेड हे गंभीर जखमी झाले होते. नंतर स्थिती गंभीर झाल्याने त्यांना पॅसिफिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.उपाचारादरम्यान बंजरंग बाबासाहेब जगदाळे यांचा दि १ एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह खर्डा पोलिस ठाण्यात आणुन ठेवला. सदर अपघातास कारणीभूत असलेल्या स्कूल बस ड्रायव्हरवर खूनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करत पोलीसांच्या कामावर संताप व नाराजी व्यक्त केली. खर्डा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर आरोप केले आहेत. खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दि २४ मार्च रोजी केला होता. पोलिसांनी या तपासाकडे कमालीचे दूर्लक्ष केले आहे. घटनास्थळी पंचनामा देखील झाला नाही, पोलिसांचे व आरोपीचे आर्थिक देवाणघेवाण झाले असल्याचेही मृतांच्या कुटुंबाने आरोप केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना सदर प्रकरणाच्या तपासा बाबत दिरंगाई का केली आहे असे विचारल्यास झंजाड यांनी सांगितले की आम्ही ऑनलाइन पंचनामा केला आहे पण तपासी अंमलदार स. फौ/सय्यद हे सुट्टीवर आहेत. म्हणून आरोपीचा तपास करता आला नाही. पोलिसांच्या उलटसुलट उत्तरांमुळे मृताचे कुटुंब व वाकी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत व न्यायची मागणी करत आहेत.
गुन्ह्यातील आरोपीला अटक करावी व त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा जर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्या दालनात जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा मृताच्या कुटूंबाने व वाकी ग्रामस्थांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिला आहे. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!