Homeव्हिडिओ बातम्यास्वप्नील खाडे यांची निर्दोष मुक्तता; जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

स्वप्नील खाडे यांची निर्दोष मुक्तता; जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

स्वप्नील खाडे यांची निर्दोष मुक्तता;

जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे यूवा कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले स्वप्नील खाडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना जामखेड येथे घडली असून स्वप्नील खाडे यांना दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की स्वप्नील खाडे यांना जामखेड पोलिसांनी दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि.१९ एप्रिल २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला. होता.त्यानंतर दि. २७ एप्रिल २०२२ रोजी त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते.
त्यानंतर आता दि. 10 मार्च 2025 रोजी अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाने स्वप्नील खाडे यांना निर्दोष मुक्त केले असून न्यायालयाच्या निर्णयानुसार, आरोपीचे जामीनपत्र रद्द करण्यात आले आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 437A अनुसार पी.बी. आणि एस.बी. रु. 15,000/- ची जबाबदारी सांगितली गेली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानुसार, आरोपपत्रात नमूद केलेले मुद्दे निरुपयोगी असल्याचे नमूद करण्यात आले आणि त्यांची संचिका बंद करण्यात आली. न्यायालयाने स्वप्नील खाडे यांना भारतीय दंड संहिता कलम 307 नुसार दंडनीय गुन्ह्यांमधून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 235 (1) द्वारे निर्दोष मुक्त केले आहे.

चौकट
स्वप्नील खाडे यांच्या अटकेमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण तालुक्यावर मोठा परिणाम झाला होता. त्यांच्या निर्दोष मुक्ततेमुळे त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला दिलासा मिळाला आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!