Homeव्हिडिओ बातम्यागरिबांचे रेशनिंग धान्य काळ्याबाजारात: मुद्देमालासह  जप्त चार आरोपी अटकेत.

गरिबांचे रेशनिंग धान्य काळ्याबाजारात: मुद्देमालासह  जप्त चार आरोपी अटकेत.

गरिबांचे रेशनिंग धान्य काळ्याबाजारात:
मुद्देमालासह  जप्त

चार आरोपी अटकेत.

जामखेड प्रतिनिधी

गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना जामखेड शहरातील जांबवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ पिकअप गाडी पकडली. यात ५५ हजार ९०० रुपयांच्या ४३ रूपयांच्या धान्याच्या गोण्या व एक पांढर्‍या रंगाची पिकप असा २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पिकअप चालकासह चौघांविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश पोपट बांगर (रा. मोहा), विष्णु टकले, आशोक टकले (पुर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. बटेवाडी व वाहनचालक लखन सतिश क्षीरसागर (रा. साकत फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजे सुमारास वाहन चालक लखन सतिश क्षिरसागर हा पांढर्‍या रंगाचे पिकअप क्रमांक एम. एच.१२ एमव्ही७२४३ मधून रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चालला होता. याबाबतची माहिती तहसीलदार गणेश माळी यांना समजली. त्यांनी तातडीने पथकासह या वाहनाचा पाठलाग केला. हे वाहन नगररोडकडून शासकीय विश्रामगृहाच्या समोरून विंचरणा नदीच्या जुन्या पुलावरून जांबवाडी रोडकडे जात असतांना तहसीलदार माळी यांनी ते थांबवून त्याची तपासणी केली.

यावेळी त्यांना पिकअपमध्ये तांदुळाचे ४३ कट्टे मिळून आले. या गोण्यावर गव्हमेंन्ट ऑफ पंजाब असे नाव होते. यानंतर सदरचे वाहन व धान्य पकडुन जामखेड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी शासकीय धान्य गोदामाचे गोदामपाल बाळु भोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस करत आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!