Homeव्हिडिओ बातम्यामहामार्गाचे ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा ::- काकासाहेब गर्जे ...

महामार्गाचे ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा ::- काकासाहेब गर्जे  अर्धवट रस्त्याच्या कामामुळे अनेक अपघाताच्या घटना

महामार्गाचे ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा ::- काकासाहेब गर्जे 

 

अर्धवट रस्त्याच्या कामामुळे अनेक अपघाताच्या घटना

 

जामखेड प्रतिनिधी –

 

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग 548 डी

या रस्त्याचे काम अर्धवट आवस्थेत आहे

या ठिकाणी कोठेही दिशादर्शक फलक लावले नाहीत किंवा आपघात होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नाही तसेच रस्ता दुभाजक टाकले आहेत अशा ठिकाणी रिप्लेक्टर बसवले नाहीत. त्यामुळे या अर्धवट रस्त्यावर अनेक आपघाताच्या घटना घडल्या.आहेत. अनेकांना प्राण गमावले आहेत.तसेच शहरात महामार्गाचे काम रखडल्याने नागरिक, व्यावसायिक हैराण झाले आहेत. विशेषतः बऱ्याच ठिकाणी काम अर्धवट स्थितीत असल्याने उडणारी धूळ त्रासाचे कारण ठरत आहे. रस्त्यावर खाचखळगे, फुफाटा आहे. यामुळे वाहनधारक, दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांना सततच्या धुळीमुळे श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. यामुळेच गेल्या दोन दिवसापूर्वी जामखेड शहरातील व्यापारी स्व.महादेव काळे व जामखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी गुडवाल यांचे आपघाती निधन झाले आणि या आपघाताला सदर रस्त्याचे काम करणारी कंपनी व ठेकेदार कारणीभूत आसुन त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा प्रशासनाने दाखला करावा. 

अन्यथा दि. ३/३/२०२५ रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आल्याचे निवेदन काकासाहेब गर्जे यांनी प्रशासनाला दिले आहे.निवेदन त्यांनी म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्गाचे झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य आहे नागरिकांच्या जिवाशी ही कंपनी व ठेकेदार खेळत आहे कामांमधे सातत्य नाही त्यामुळे आनेक आपघाती मुत्यू झाले आहेत. अनेकांना आपंगत्व आले आहे आशा ठेकेदारावर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे

नायब तहसीलदार पाडळे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब गर्जे, नगरसेवक गणेश आजबे, नगरसेवक ऋषिकेश बांबरसे उपस्थित होते.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!