Homeव्हिडिओ बातम्याजामखेडमध्ये इरटीका गाडीने पेट घेतला गाडीसह दोन जणांचा जळून अक्षरशः कोळसा

जामखेडमध्ये इरटीका गाडीने पेट घेतला गाडीसह दोन जणांचा जळून अक्षरशः कोळसा

जामखेडमध्ये इरटीका गाडीने पेट घेतला
गाडीसह दोन जणांचा जळून अक्षरशः कोळसा

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर दूभाजकाला इरटीका धडकली. गाडीतील सीएनजी गँसने पेट घेतला. यामध्ये गाडी व गाडीतील दोन जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला. सदर दूर्दैवी घटना दि २४रोजी पहाटे ४वाजेदरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. जामखेड नगरपरिषदच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले मात्र तोपर्यंत गाडीने पुर्ण पेट घेतला होता. गाडीमधे जळुन मृत्यू झालेल्यामध्ये जामखेडचे पोलीस कर्मचारी गुडवाल व जामखेड मधील साईनाथ पाँन शाँपचे व्यापारी महादेव काळे यांचा समावेश असल्याचे समजते. गाडीची दूभाजकाला जोराची धडक बसल्याने गाडीचा टायर १००-१५०फुटावर फेकले गेले. इरटीका गाडीची रचना अत्याधुनिक पध्दतीची असल्याने गाडी लाँक झाली त्यामुळे आतील दोन जणांना बाहेर पडता आले नाही. गाडीबरोबर तेही इतक्या भयानक प्रकारे जळाले आहेत की त्यांच्या शरीराची कसली ओळख करणे कठीण आहे. सदर घटनेची पुढील माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस घेत आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!