सरत्या वर्षांत
जामखेड शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख घटला
मात्र
राजकीय अन् बाहेरची गुन्हेगारी दहशत कायम :
यासीन शेख/जामखेड :
जामखेड तालुका हा मराठवाड्याच्या सरहद्दीवरील पूर्वापार दुष्काळी भाग हीच आजही जामखेड तालुक्याची ओळख आहे. कोणतेही पाट पाणी, मोठ्या नद्या नसल्याने सिंचन प्रकल्पांचा अभाव असलेल्या या परिसरातील शेती ही पावसावर अवलंबून आहे. कसलाही मोठा उद्योगधंदा रोजगाराची भक्कम साधणे नसतांना जामखेड तालुका अस्ताव्यस्त वाढत आहे.त्याचबरोबर प्रवाशांच्या संख्येतही भरपूर वाढ होत आहे.तशी वाहतुकीच्या, गर्दीच्या, वास्तव्यच्या, सुरक्षेच्या समस्या वाढत आहेत. गर्दीमुळे भुरट्या चोरांना उत्तम ‘वातावरण’ मिळते तर जिल्हा सीमेवरून येणाऱ्यांमुळे व त्यांना आश्रय देणा-यांमुळे सराईत चोर व गुन्हेगारांना आयते कुरणच उपलब्ध होते, असा अनुभव आहे.अनेक सुशिक्षित बेरोजगार मोठ्या शहरांकडे नोकरी व्यवसायासाठी स्थलांतरित होत आहेत.शिक्षणाची परिस्थिती नसल्याने अनेक तरूण लहान वयातच गुन्हेगारीकडे वळलेले दिसत आहेत.
जामखेड पोलिस स्टेशनला पोलीसांची संख्या ५८ असुन १ पोलीस निरीक्षक ,२ सहाय्यक पोलीस निरीक्षक,१ पोसई अशा ४ आधिकारयासह ६२ जण आहेत.जामखेड शहरासह तालुक्यात ८७ गाव असून १ नगरपरिषद व ५९ ग्रामपंचायत आहेत. यापैकी ३६ ग्रामपंचायत जामखेड पोलिस स्टेशन अंतर्गत आहेत. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत खूनाचे १ (४) खूनाचा प्रयत्न ९ (१३), आर्म अँक्ट ९(५),जबरी चोरी९ (८), दरोडा ० (४),घरफोडी१८ (१५), महिला आत्याचार १०(१०) जूगार ३० (१४), दारूची १२६(१०७), पळवून नेने१६ (१२), ठकबाजी/फसवणूक१०(५) ,सावकारकी २(२), शासकीय कामात अडथळा ३ (३), दंगा ६(२८), मारामारी दुखापती८७ (९४) ,अपघाती मृत्यू १३(१७), वाळु० चोरी (४),जूगार ३०(१९), बालविवाह २(०),हद्दपारी ७(५) खंडणी २(३), गांजा पिणारे ८(५) वाहनचोरी १, मोटारसायकल चोरी ३५ अशा विविध गुन्हयांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. कंसातली आकडे मागील वर्षीचे आहेत.अशी माहिती क्राईम विभागाचे पोकाँ दत्तु बेलेकर यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत दंगा खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा,खंडणी, परजिल्ह्यांतील गुन्हेगारी, कलाकेंद्रे, खाजगी सावकारकी मूळे वाढलेल्या गून्हयांची संख्या कमी झालेली दिसत आहे. .
#राजाश्रयाने वाढली गून्हेगारी#
————
राजकारणात
पहिल्या फळीतील राज्यस्तरीय नेतृत्व असलेले दोन आमदार आहेत. चांगलं करण्याची क्षमता दोघांमध्येही आहे. मात्र राजकीय श्रेयामुळे विकासाबरोबरच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीही फायदा होण्याऐवजी हस्तक्षेपच जास्त होत असल्याचे दिसून येते. ही दूर्दैवी बाब आहे. पूर्वीप्रमाणे शेजारी असलेल्या तालुक्यातील
राजकीय नेत्याचा हस्तक्षेप सध्या होत नाहीत. तरीही पोलीसांवर याचा ताण येतोच. राजकीय आश्रयाने वाढलेल्या टोळ्या , गटातटाचे राजकारण, टोळ्यांची सामान्य माणसामध्ये दहशत,पोलिसात राजकीय हस्तक्षेप,राजकीय कुरघोडींमुळे खोटे गुन्हे दाखल, गोळीबार, गावठी कट्टे, खाजगी सावकारकी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था व लोकप्रतिनिधींच्या आड स्थानिक पदाधिकारयांचा हस्तक्षेप अशा अनेक वर्षांपासूनची परिस्थिती मोडीत काढण्याचा पोलिसांनी अनेक वेळा प्रमाणिक प्रयत्न केले मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांच्या गुन्हेगारीविरोधातील मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत.
#चौकातली सूरक्षा नजर बंद#
———–
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या खर्डा चौकात सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे राजकीय लोकांच्या बँनरच्या गर्दीमागे कधी बंद पडले ते कळलेच नाही.नागरिकांना वाटते आपली सुरक्षा चालू आहे प्रत्यक्षात एवढा मोठा नीधी खर्चुन केलेली सूरक्षा बंद पडली याकडे कोणाचेच लक्ष नाही. ही बाब दूर्दैवी आहे.
#महेश पाटील लोकांमध्ये दिसणारे आधिकारी
———————–
काम करत असतांना होणार्या राजकीय हस्तक्षेपामुळे कायम पोलीस आधिकारी व कर्मचारीच बदनाम ठरतात. जामखेड पोलिस ठाण्यात येणारया प्रत्येक तक्रारी ऐकुन घेत प्रत्येकाची तक्रार नोद केली जाते.
रात्र असो की दिवस,घटना छोटी असो की मोठी माहिती मिळताच त्या ठिकाणी लोकांमध्ये तातडीने स्वतः जाणारा आधिकारी म्हणजे पोलीस निरीक्षक महेश पाटील होय.प्रसंगानूसार कडक, नरम ,भाषेचा वापर, सर्वांचेच ऐकुण घेणं ,शेतीबांधावरील भावाभावांचे भांडण, घरातील भांडण, आई बाप- मुलांमधील वाद अशा सर्वच गोष्टी कागदावर न घेता सामोपचार व आपसात संवाद घडवून मार्ग काढून देणं असा समन्वयी विचार करणारे आधिकारी म्हणून महेश पाटील यांनी ओळख निर्माण केली.
नवीन वर्षात विधानसभा परिषद सभापती आ प्रा राम शिंदे व आ रोहित पवार यांच्यामुळे राजकीय दबाव आहेच तरी पण समाजामध्ये पोलिसांची विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे. राजकीय हस्तक्षेपाऐवजी सामन्य जनतेच्या न्यायाला प्राधान्य मिळावे, खाकीतला चांगला माणूस ऐकायला मिळावे एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.
#खमक्या आधिकारयाची गरज आहे#
———–
शेजारच्या जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. कायद्याची रक्षक यंत्रणा राजकीय वरदहस्त, दबावाखाली आहे. हे दोन्ही वाक्य एकमेकांना पूरक आहेत. या जिल्ह्य़ातील नेत्यांचा चाहता वर्ग जामखेडला मोठा आहे. गून्हेगारी क्षेत्रातील लोकांचा वावरही मोठा आहे. तसेच जामखेडच्या वाढत्या गुन्हेगारीला बाहेरच्यांचा मोठा हातभार लागत आला आहे. हे सर्वश्रुत आहे. जामखेडचे दोन्ही आमदार जनतेच्या हितासाठी कीती? स्वतःच्या श्रेयासाठी कीती? राजकीय पदाचा वापर करतात याचे विश्लेषण मोठे होईल. यांच्या राजकीय दबावाचा प्रशासनातील प्रत्येक विभागात बोलबाला आहे. गून्हेगारी क्षेत्रातील बाहेरच्यांचा मुक्त वावर व राजकीय दबावामुळे आधिकारयांचा गुन्हेगारांवर वचक नाही. त्यामुळे सुसंस्कृत असलेल्या जामखेडची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे होत असलेली बदनामी थांबण्यासाठी व राजकीय हस्तक्षेपाऐवजी सामान्य जनतेसाठी न्याय्य पद्धतीने काम करणाऱ्या खमक्या आधिकारयाची जामखेडला गरज आहे.