Homeव्हिडिओ बातम्यामला रोखण्यासाठी महाकाय प्रयत्न :- आमदार रोहित पवार ...

मला रोखण्यासाठी महाकाय प्रयत्न :- आमदार रोहित पवार #आ. रोहित पवार शड्डू ठोकुन तैयार

जामखेड प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीबाबत डाव- प्रतिडाव आखले जात आहेत. यासंदर्भात  आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या संदर्भात “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं भाजपाने सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज आहे असे आ रोहित पवार यांनी सांगितले. तसेच या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वासही आ रोहित पवार यांनी व्यक्त केला.

विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला ७ -११ जागा, शिंदे गटाना १७-२२ जागा तर भाजपला ६२-६७ मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे भाजपमध्ये भीती पसरली आहे. या सर्व्हेनंतर केंद्रातून हालचाली सुरु झाल्या असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेवर रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, अजित पवारांनी भाजपच्या एका बड्या नेत्याने काही ठराविक जागा ऑफर केल्या.

 

अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर देण्यात आली आहे, असेही आ. रोहित पवार यांनी सांगितले .

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!