जामखेड प्रतिनिधी
. जर कारवाई झाली नाही तर या मुलामलींसह पुढचे आंदोलन नगर येथे करणार असा इशारा आ. निलेश लंके यांनी दिला.अकरा दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आ. निलेश लंके यांनी भेट देऊन या संदर्भात तिन्ही विद्यापीठांना कारवाई करण्या संदर्भात तातडीने आजच पत्र देणार आहे असे सांगत रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरेच्या विरोधात सुरू ११ दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थीचे आंदोलन व शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे उपोषण आज शुक्रवार दि १५ रोजी आ. निलेश लंके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळपाणी घेऊन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
आ. निलेश लंके, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, आर पी आय जिल्हाअध्यक्ष सुनिल साळवे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, राजेंद्र कोठारी, रमेश आजबे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, हवा सरनोबत, शहाजी राळेभात, सनी सदाफुले, पवन राळेभात, डॉ. भरत दारकुंडे, सचिन देशमुख, प्रशांत राळेभात, विजय राळेभात, भाऊ पोटफोडे, भाऊ म्हेत्रे, गणेश जोशी, आकाश घागरे, राजेंद्र गोरे प्रफुल सोळंकी, शुभम हजारे सह ग्रामस्थ उपस्थित होते.