Homeराजकीयचांगल्या ध्येयाची सुरुवात विद्यार्थी दशेतच करा : बाळासाहेब धनवे

चांगल्या ध्येयाची सुरुवात विद्यार्थी दशेतच करा : बाळासाहेब धनवे

भोरे काँलेजमध्ये करिअर मार्गदर्शन संपन्न :
जामखेड प्रतिनिधी
क्षेत्र कोणतेही लहान मोठे नाही.आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवड केल्यास ध्येय गाठणे सोपे जाते .जीवनात ध्येय निश्चिती विद्यार्थी दशेतच करावी .त्यावर लक्ष केंद्रित करून काम केले तर मिळविणे सोपे जाते असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले.जामखेड तालुक्यातील
सनराईज शैक्षणिक संकुलाच्या स्व. एम. ई.भोरे ज्युनिअर कॉलेज साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण, अभ्यासक्रम, नोकरी, करीअर
मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे,संकुलाच्या प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे), प्रा. विनोद
बहीर, प्रदीप भोंडवे, अमोल कसाब, नारायण आयकर, प्रल्हाद डिसले, सागर कदम,श्रीमती स्वाती पवार, सुष्मा भोरे, सविता काळे, तेजस भोरे, यशराज भोरे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिनकर सरगर, महेश पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते बाळासाहेब धनवे पूढे म्हणाले की, करिअरच्या क्षेत्रात मेडिकल- इंजिनिअरिंग शिवायही अनेक क्षेत्रे आहेत . युपीएससी, एमपीएससी, संशोधन याबरोबरच तुम्ही मोठे उद्योग व्यवसायही उभे करू शकता. यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यास मी नेहमीच तयार आहे. सध्या तालुक्यातील दुर्गम ठिकाणच्या शाळांमधील विद्यार्थी गुणवत्तेत पुढे येत आहेत. शिक्षक, पालक व ग्रामस्थांचाही शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढला आहे. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय
भोरे म्हणाले की, सनराईज एज्युकेशन संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करतेच परंतु समाजातील विविध घटकांसाठीही अनेक उपक्रम राबवत असते.
आजच्या अधुनिक युगात मुलांना चांगले शिक्षण मिळण्याबरोबरच करिअर मार्गदर्शन मिळणेही आवश्यक आहे .जामखेड तालुक्यातील
शैक्षणिक क्षेत्रात आलेली मरगळ
झटकण्याचे काम धनवे साहेब करत आहेत.त्यांच्यामुळे तालुक्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता
कमालीची सुधारली आहे. त्याचा फायदा स्व.एम.ई. भोरे ज्युनिअर कॉलेज साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय नक्कीच होईल
असे मत डॉ. संजय भोरे यांनी व्यक्त केले .
यावेळी पत्रकार नंदू परदेशी यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दादासाहेब मोहिते यांनी तर आभार चंद्रकांत सातपुते मानले.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!