उद्योजक रमेशभाऊ गुगळे ,पत्रकार मोहिद्दीन तांबोळी ,डॉ रोहन टोमके,आदी सन्मानित

जामखेडला संविधान महोत्सव उत्साहात साजरा

जामखेड प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनी जामखेड येथे संविधान महोत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे संविधान महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला .गेल्या ११ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमाद्वारे संविधान जागृती करत संविधान महोत्सव साजरा करण्यात येतो.
यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना समाजाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सामाजिक क्षेत्रातून रमेशभाऊ गुगळे, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. रोहन टोमके, पत्रकारिता क्षेत्रातून मोहीद्दीनभाई तांबोळी,शैक्षणिक क्षेत्रातून एकनाथ चव्हाण, महिला सामाजिक क्षेत्रातून अरुणा सदाफुले व द्वारका पवार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, मुख्याधिकारी अजय साळवे ,वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अँड अरुण जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, नगरसेवक अमित चिंतामणी, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, अशोक आव्हाड ,पंडित मोरे, प्रकाश सदाफुले, प्रभाकर घायतडक, नामदेव गंगावणे, कदम गुरुजी, प्रभाकर सदाफुले, मुरलीधर सदाफुले, सुनील जावळे,मुकुंद घायतडक, प्रा राहुल आहेर, सुरेखा सदाफुले, मालन घायतडक ,वस्तीगृहाच्या अधीक्षक शोभा कांबळे, ज्योती जावळे, कुसुम साळवे, रोहिणी सदाफुले आदी उपस्थित होते.यावेळी खर्डा चौकात भारतीय संविधान प्रतिकृतीचे आ प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते पूजन व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.दरम्यान जामखेड शहरातून
भिमसैनिकांनी निळे ध्वज व तिरंगी ध्वज घेऊन मोटरसायकल रॅली काढून जय भिम जय संविधान च्या घोषणाने जामखेड वासियांचे लक्ष वेधून घेतले होते .

बातमी शेअर करा...