Homeव्हिडिओ बातम्याशिक्षकांनी मुलांना आर्थिक साक्षर करावे :- दिलिप तिजोरे

शिक्षकांनी मुलांना आर्थिक साक्षर करावे :- दिलिप तिजोरे

एच यू गुगळे पतसंस्थेच्या
फँमिली फंडाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण:
जामखेड प्रतिनिधी

एच यू गुगळे पतसंस्थेने फँमिली फंड म्हणजे मूलांच्या जीवनावर पालकांपेक्षा शिक्षकांच्या शिकवण्याचा प्रभाव जास्त असतो .शिक्षक जी गोष्ट समजावून सांगतील ती महत्त्वाची वाटते ती गोष्ट मूलं करतात .तेव्हा शिक्षकांनी मूलांना जीवनातील आर्थिक साक्षरता म्हणजे बचत शिकवली पाहिजे असे प्रतिपादन सहायक निबंधक दिलिप तिजोरे यांनी केले . बचत ही सर्वाच्याच जीवनाशी निगडित बाब आहे एच यू गुगळे पतसंस्थेने बचतीची सवय लागण्यासाठी चालू केलेला अनोखा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले .
जामखेड येथील एच. यु. गुगळे पतसंस्थेच्या वतीने ‘फॅमिली फंड’ नकळत होणारी बचत या योजनेचा लोकार्पण सोहळा दि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला .यावेळी ते अध्यक्षस्थावरून बोलत होते .
यावेळी गोमातेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक दिलिप तिजोरे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, विजय नागरी बँकचे योगेश उपासनी , सुर्यकांत गांधी ,चार्टर्ड अकाऊंटंट घनश्याम सोळंकी , राजेंद्र कोठारी ,शांतीलाल गुगळे, लक्ष्मण भोरे मेजर, रमेश गुगळे,दिलिप गुगळे, संजय गुगळे, वैभव कुलकर्णी ,जुबेर पठाण, श्याम पंडीत, मिलींद भिडे, विठ्ठल कुलकर्णी, सारिका इंगळे, देवयानी पुजारी यांच्या सह विविध शाळेतील मूलं मूली पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी सांगितले की रमेशभाऊ गुगळे यांच्या नवनवीन संकल्पनेतून बँक यशस्वीरीत्या वाटचाल करीत आहे .विविध योजनेतून लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत .बँकेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात .बँक फक्त व्यवसाय न करता रमेशभाऊ गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाभिमुख उपक्रम व योजना राबविल्या जातात.
यावेळी एच यू गुगळे पतसंस्थेचे चेअरमन रमेशभाऊ गुगळे म्हणाले की
प्रत्येक घरातील लहान मुलांना बचतीची सवय लागण्यासाठी एच यू गुगळे पतसंस्थेने सुरू केलेल्या
” फँमिली फंड” या योजनेला जामखेड तालुक्यातुन फार मोठा प्रतिसाद मिळत आहे .यामुळे पालकांचा आणि मूलांचा संवाद वाढला आहे ही आनंदाची गोष्ट आहे .आम्ही फक्त
बँकींग व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी जपली जावी त्यादृष्टीने आम्ही काम करतो .
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून आम्ही महिला बचत गटांची सूरूवात केली .यामध्ये मोठ्या संख्येने महिला रोजगारासाठी विविध व्यवसाय करत आहेत .
लवकरच महिलांना व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे असेही रमेशभाऊ गुगळे यांनी सांगितले .
.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रसाद बेडेकर यांनी केले

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!